Shiva Shaurya Gatha : आज राज्यात लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात (Victoria and Albert Museum) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक ‘वाघनखे’ आणल्यात आली आहे. मात्र काही इतिहास तज्ज्ञांसह विरोधकांनी देखील सरकारच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधकांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज साताऱ्यात ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसांसाठी आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक मराठी मनं सुखावली आहे. प्रत्येकज जण या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता. उद्यापासून सर्व शिवप्रेमींना या वाघनखांचे दर्शन होणार. हे दर्शन या वाघनखांचं नसून शिवरायांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचं होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मी आज इथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवरायांचा मावळा म्हणून उभा आहे.शेकडो मैल प्रवास करत ही वाघनखं आपल्या मराठी भूमीत दाखल झाली आहे. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी खूप प्रत्यन केले. मात्र आज काही लोक या वाघनखांवर शंका उपस्थित करत आहे. हे आपलं दुर्दैवं आहे.
महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं येत आहे. मात्र तरीही देखील काही लोकांना या प्रकरणात राजकारण करण्याचं आहे. आज अनेकांकडून चांगल्या कामांना गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, हा शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तर विरोधकांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वेळेवर आणली. खरं तर मी मारलेले वरखडे अनेकदा दिसत नाहीत आणि ते बसले तर तोंड उघडून सांगता येत नाही. आणि म्हणून या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
जरांगेंकडून महादेव जाणकरांचा उल्लेख मात्र पुन्हा भुजबळांना टोला, म्हणाले, आमचा विरोधक …