Download App

ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश, राष्ट्रवादीकडून बीड विधानसभा लढणार?

आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

  • Written By: Last Updated:

Jyoti Mete : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. बहुतांश सत्ताधारी आमदार मविआच्या (Mahavikas Aghadi) घटकपक्षांध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. बीडमधून शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Parner Vidhansabha : आदित्य ठाकरेंच्या भेटीनंतर पठारे विधानसभेच्या तयारीला… 

विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी सांभाळत होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. त्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांशीची चर्चाही केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी बीड लोकसभेतून माघार घेतली. दरम्यान, आज ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला. ज्योती मेटे यांच्यासोबत सलीम पटेल, बाळासाहेब खोसे यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Beed Politics : भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची पक्षाला सोडचिठ्ठी, अपक्ष निवडणुक लढवणार? 

पक्षात प्रवेश केल्यानंतर ज्योती मेटे यांनी उमेदवारीबाबत सूचक भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असतांना विधानसभा निवडणूकीचेच कारण आहे. आमची शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला. बीड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आमचा प्रस्ताव मांडलेला आहे. आमची यासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला, असंही स्पष्ट करत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आम्ही चोखपणे पार पाडणार आहोत, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

मेटे या बीड विधानसभेसाठी इच्छूक असल्या कारणाने त्यांचा हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

शिवसंग्राम कोण सांभाळणार?

ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर शिवसंग्राम संघटना कोण सांभाळणार? असा प्रश्न त्यांना विचारला असता ज्योती मेटे म्हणाल्या, शिवसंग्राम संघटनेची धुरा कोण सांभाळणार हा मुद्दा नाही. आपल्या सर्वांना आठवत असेल की, विनायक मेटे यांच्या निधनानंतर झालेल्या आमसभेत माझी एकमताने अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली होती. त्यामुळे संघटनेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

follow us