Download App

कसब्यात ठाकरे गटाची गोची; Sambhaji Brigade पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak )  यांच्या निधनानंतर कसबा पेठ ( Kasaba Byelection )  विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून येत्या 26 फेब्रुवारीला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असताना शिवसेने  ठाकरे गटाचा ( Shivsena Thakare Camp )  मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडमुळे ( Sambhaji Brigade )  महाविकास आघाडीत शिवसेनेची  गोची होतांना दिसत आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यातील लाल महल येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. दरम्यान, अशातच महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ही निवडणूक लढवत असताना मित्रपक्षाने मात्र शिवसेनेला वैताग आणला आहे.

दरम्यान, आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे मोहिते यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून विनंती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मोहिते यांची भेट घेऊन त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यानंतर आधीच शिवसेनेसमोर मोठा प्रश्न असताना इकडे कसब्यात देखील मित्रपक्षाने शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे अहिर यांची शिष्टाई कामाला येऊन चिंचवड आणि कासब्यात महाविकास आघाडीचा मार्ग सुकर होणार का?, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून प्रतिक्रिया आली आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्ष आमच्यावर दबाव टाकत आहेत. मात्र संभाजी ब्रिगेड कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व महासचिव या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच कसबा व चिंचवड मतदार संघात संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ‘आम्ही मागे हटणार नाही.’ वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस संतोष शिंदे यांनी संगितले आहे.

Tags

follow us