Download App

बऱ्याच वर्षापासून गृहखात असल्याने त्यांचा आकडे लावण्याशी संबंध..; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका

बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे गृहखात असल्यानं त्यांचा आकडे लावण्याशी जवळचा संबंध आहे, असं टीकास्त्र भास्कर जाधवांनी फडणवीसांवर डागलं.

  • Written By: Last Updated:

Bhaskar Jadhav on Devendra Fadnavis : षण्मुखानंद सभागृहातीतल शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन सोहळ्यात बोलतांना भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) जोरदार भाषण केलं. यावेळी बोलतांना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच (Devendra Fadnavis) नाव न घेता टीका केली. बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे गृहखात असल्यानं त्यांचा आकडे लावण्याशी जवळचा संबंध आहे, असं टीकास्त्र जाधवांनी डागलं.

आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो, तुम्ही भेंडी बाजार शोधा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज 58 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह, भास्कर जाधव, संजय राऊत, नवनिर्वाचित खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना जाधव म्हणाले की, गेल्यावेळी म्हणायचे की, मोदींचा फोटो लावल्याने शिवसेनेचे खासदार निवडून आले. आता आम्ही मोदींचा फोटो काढला आणि आमचे 31 खासदार निवडून आले, मात्र भाजपच्या आहेत त्या जागा कमी होऊन सातवर आल्या, असा टोला जाधव यांनी लगालला.

मिंदेला बाजूला ठेवा अन्… भरसभेत उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान 

दिल्लीश्वरांचा माज जनतेने उतरवला….
गेल्या वेळी भाजपचे 23 उमेदवार होते, आता महायुतीच्या खासदारांची एकूण संख्या 17 आहे आहे. विरोधकांच्या 48 उमेदवारांच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता, मात्र ठाकरे सोबत नसल्याने त्यांना अपयश आले, 400 पारचा नारा देऊन सत्तेचा माज दिल्लीश्वरांनी दाखवला, त्या दिल्लीश्वरांना देशातील जनतेने जागण्यावर आणले. अशी टीकाही जाधवांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता खोचक टीका केली. काही लोक आज स्ट्राईक रेटच्या गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडून काहीही आकडे सांगितले जात आहेत. खंरतर बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे गृहखात असल्यानं त्यांचा आकडे लावण्याचा जवळचा संबंध आहे, अशी टीका जाधवांनी केली.

जाधव म्हणाले, आज त्यांनी स्ट्राइक रेटच्या गोष्टी करू नयेत. 23 खासदार असूनही या निवडणुकीत त्यांचे 17 खासदार निवडून आले. तर इंडिया 30 खासदार निवडून आले. हा उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. त्यांनी आमचे 13 खासदार चोरले, तेव्हा आमच्याकडे 5 खासदार राहिले होते. मात्र, त्या पाच खासदारांचे 9 खासदार उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. त्यामुळे आमचा स्ट्राइक रेट 200 आहे. भाजपने आमच्या स्ट्राईक रेटच्या नादी लागू नये, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.

follow us