मिंदेला बाजूला ठेवा अन्… भरसभेत उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

मिंदेला बाजूला ठेवा अन्… भरसभेत उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडीला (MVA) मिळालेल्या यशानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shiv Sena) 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मेळाव्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) देखील जोरदार टीका केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मोदीजी तुम्ही सभा घ्या, या मिंदेला बाजूला ठेवा आणि माझ्यासमोर निवडणूक लढा असा आव्हान त्यांनी नरेंद्र मोदींना या मेळाव्यात बोलताना दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला तडाखा बसला आहे. आम्ही ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत जाणार नाही. या मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाण चिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात.

मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या, या मिंदेला बाजूला ठेवा आणि माझ्यासमोर निवडणूक लढा. असा आव्हान देखील त्यांनी यावेळी मोदींना दिला.

तसेच फक्त सत्तेसाठी भाजपने हिदुत्व सोडले आहे. त्यांनी सरकारमध्ये हिंदूंच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना घेतलं आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हिंदुत्वादी आहे का? असा सवाल विचारात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तसेच तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व का सोडले याचा उत्तर मोदींनी द्यावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

तर फक्त मला विरोध करण्यासाठी काही जणांनी मोदींना उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला असं म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लावला. तसंच लोकशाही वाचवा, संविधान वाचवा हा आंतकवाद असेल तर मी आंतकवादी आहे.

शिवसेना फोडणाऱ्या नालायकांसोबत जाणार नाही, ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

या निवडणुकीत शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली. सर्व देशभक्तांनी आम्हाला मत दिली आहे. मी हिंदुत्व सोडलं नाही संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला देशभक्तांनी मतदान केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज