उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय, विधानसभा निवडणुकीत लढवणार 288 जागा?, पदाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात 48 जागांपैकी 32 जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडी (MVA) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात शिवसेनेला आघाडी मिळाली होती त्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या जागांचाही अहवालचा अभ्यास करणार आहे. यामुळे पक्षाच्या संपर्कप्रमुखांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 288 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला आहे.
माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत किंवा स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवली तर काय होईल याचा अहवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपर्कप्रमुखांकडे मागितला आहे.
पक्षासाठी विधानसभा मतदारसंघ अनुकूल आहे का? जर मतदारसंघ अनुकूल असेल तर उमेदवार कोण असावा? आणि संभाव्य विजयाचे समीकरण काय असेल याबाबत ठाकरेंनी शिवसेना संपर्कप्रमुखांकडे अहवाल मागितला असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही याबाबत देखील अहवाल मागवण्यात आला आहे.
कसा बनवणार विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल?
1. लोकसभा निवडणूक 2024 चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल.
2. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?
3. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?
4. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?
5. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?
6. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?
7. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?
8. बिएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.
9. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?
10. लोकसभा निवडणूक 2024 आपला अभिप्राय थोडक्यात?
बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमात धर्मांतरानंतर करणारा जमीर शेख पुन्हा स्वीकारणार मुस्लिम धर्म
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने 48 पैकी 32 जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक 13 जागांवर तर शिवसेना (ठाकरे गट) 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 08 जागांवर विजय मिळाला होता तर एक जागेवर अपक्ष उमेदवार जिंकून आले होते.