Download App

संजय राऊत हा महालोफर माणूस, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

Gulabrao Patil : संजय राऊतांन (Sanjay Raut) नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा राऊतांनी केला. राऊतांच्या या दाव्यावर आता मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊत हा महालोफर माणूस आहे, अशी टीकाही केली.

चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी भासवून मुलींशी अश्लील कृत्य; आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा… 

गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राऊतांच्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे. बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं, मोदी गया तो गुजरात गया… संजय राऊत त्यावेळेस पत्रकार होते, संपादक होते. भाजपमध्ये काय चाललं ते त्यांना माहित नव्हते. मात्र, आता हा भाऊ एकटाच तिकडे राहिलाय, त्यामुळं ते बोलत आहेत. संजय राऊत त्यावेळी काय मध्यस्थ नव्हते, की त्यांनी त्यावेळी सर्व गोस्ट पाहिल्या. एवढ्या मोठ्या लोकांवर त्या माणासाने बोलनं मला उचित वाटत नाही. मोदी साहेबांच्या मनात बाळासाहेबांबद्दल कायमचं आदराचं स्थान आहे. कायम राहणार आहे. आजही कोणी म्हणत असेल, बाळासाहेबांची शिवसेना संपली तर निश्चितच नाही. कारण, आम्ही त्यांचे शिवसैनिक आजही जिवंत आहोत, असं पाटील म्हणाले.

राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका 

बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेबांचा आणि पवार साहेबांचा पक्ष भाजपने लोफर व्यक्तींच्या हातात दिला, असा आरोप राऊत यांनी केला. त्यावरही गुलाबराव पाटलांनी भाष्य केलं. संजय राऊत महालोफर आहे, अशी टीका पाटलांनी केली.

बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या या पुस्तकावर टोला लगावला. कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळं मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलं.

राऊतांच्या पुस्तकाविषयी नितेश राणे म्हणाले, या पुस्तकातील काही पाने लिहायची राहिली असतील. जेलमध्ये असताना ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंची जी काही लायकी ते इतरासंमोर बोलताना काढायचे, त्याची जी काही माहिती आमच्याकडे आलीये, त्या बाबतीतही उल्लेख करा पुस्तकात. अर्ध, अपुरे पुस्तक लिहू नये. पूर्ण पुस्तक काढा, मग त्यांना नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव टाकरेच करतील, असं राणे म्हणाले.

follow us