शाहांना ईडीचा बांबू लावला तर शिवसेनेत येतील; संजय राऊतांनी सांगितली भाजपची स्ट्रॅटेजी

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाहांना (Sanjay Raut) ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली आहे. लेट्सअप मराठीने घेतलेल्या लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात त्यांनी खास मुलाखत दिली. यावेळी संजय राऊत यांनी ऑर्थर जेल ते राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य केलंय.
‘…तर रवींद्र वायकर यांनी आत्महत्या केली असती’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा कसा होऊ शकतो. एकनाथ शिंदेंना पक्षाचे विचार सांगायला लावा, बघा सांगता येतील का. ते अमित शाहांची चाटूगिरी करातात हे पक्षाचे विचार आहेत का? अजित पवारांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाहा आहेत. महाराष्ट्रातील भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट अमित शाहा चालवतात. उद्या माझ्या हाती सीबीआय, ईडी हाती आली तर अमित शाह शिवसेनेत येतील, त्यांच्यामागे ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील किंवा देश सोडून जातील, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.
चाहत्यांना मोठा धक्का, No Entry 2 मध्ये दिसणार नाही दिलजीत दोसांझ, कारण काय?
तसेच ऑर्थर जेलमधील एक मिनिट 24 तासांसारखा आणि एक दिवस वर्षासारखा वाटतो, जेलमधला दिवस उगवू नये असं वाटतं उठल्यावर काय करायचं. माणसाला निराश डिप्रेशनमध्ये आणणारी जागा असते. तुम्हाला अनेक गोष्टी आठवत नाहीत. रोज भेटणाऱ्या माणसांना माणूस विसरतो. तुरुंगाचं वैशिष्ट्यच ते असतं की, तुम्ही सगळं विसरुन जा. देशातील सर्वाधिक भ्रष्ट जागा म्हणजे तुरुंग. तुरुंगात वर्तमान पत्र येतं पण त्यात सरकारविरोधात बातम्या कापून येत असतात. तुरुंगासंदर्भातील बातमी कापून येत असतात, असा दावा संजय राऊतांनी केलायं.
नरकातील स्वर्ग पुस्तकात नेमकं काय?
खासदार संजय राऊत यांनी ऑर्थर तुरुंगात असताना नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं लिखाण केलंय. या पुस्तकामध्ये राऊत यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर सडेतोडपणे भाष्य करीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. गोध्राकांडामध्ये शरद पवारांच्या परखड भूमिकेमुळेच नरेंद्र मोदी यांची अटक टळली असल्याचा दावा संजय राऊत यांनी या पुस्तकात केला आहे. यासोबतच गुजरात दंगल प्रकरणात अमित शाहांना एका फोनवर बाळासाहेब ठाकरे यांनी संकाटतून बाहेर काढलं असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.राऊत यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळातलं राजकारण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळत आहे.