Download App

विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट केल्यास राज्याचं राजकारण सोपं…

Vijay Shivtare On Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवतारे म्हणाले की, अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यास पुरंदरच काय महाराष्ट्राचं(Maharashtra) राजकारण (Politics)सोप्प होईल असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

अमित शाह यांच्या ताफ्यात शिरला दुचाकीस्वार, पोलिसांनी घेतले ताब्यात

सध्या राज्याच्या राजकारणात अजित पवारांबद्दल विविध चर्चांना तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार कोसळल्यास भाजपचा अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्लॅन बी असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता विजय शिवतारे यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

विजय शिवतारे आज बारामती लोकसभा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या भाजप समर्थनावर प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केला तर महाराष्ट्राचं राजकारण सोप्प होईल. चांगले लोक एकत्र आल्यास राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्की येतील, असेही ते म्हणाले. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून अजित पवारांबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. ते काही दिवसांपूर्वी अचानक नॉटरिचेबल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते.

Tags

follow us