Download App

…त्यांना कडक शासन करा, अन्यथा सरकारवर ठपका पडेल, गोगावलेंचे बीड हत्या प्रकरणावर मोठं विधान

मस्साजोगच्या सरपंच हत्ये प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Bharat Gogawale : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन वीस दिवस उलटले तरीही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केली. बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, यावर मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी देखील मोठं भाष्य केलं.

ब्लॅक ब्युटी! अमृता खानविलकरचा लूक चर्चेत 

मस्साजोगच्या सरपंच हत्ये प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, अन्यथा आमच्या सरकारवर ठपका पडेल, असं गोगवलेंनी म्हटले आहे.

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, बीड जिल्ह्यातील जी हत्येची घटना घडलीये, ती अत्यंत दुर्देवी आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आली आहे. या घटनेत जे-जे आरोपी असतील त्यांना शासन व्हायला पाहिजे. आमचं महायुतीचे सरकार जर हे करू शकलं नाही, तर तो ठपका आमच्यावर पडेल, असं गोगावलेंनी म्हटलं

हसन मुश्रीफ काय म्हणाले?
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड यांना संरक्षण मिळत आहे, मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी होतेय. यावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. मुश्रीफ म्हणाले, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही, तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकत नाही, असं ते म्हणाले.

बीडमधील मोर्चा वाटला नाही, तो शिमगा – गुणरत्न सदावर्ते
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण किती करायचे याला मर्यादा असतात. वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही तो मोर्चा काढला होता, परंतु, तो शिमगा वाटत होता. दु:ख आणि दुखवटा कशाला म्हणतात ते एसटीतल्या कर्मचाऱ्यांकडून शिका, असा हल्लाबोल सदावर्तेंनी धस यांच्यावर केलाय.

follow us