Download App

‘राष्ट्रवादीत फूटच, दोन दगडांवर पाय….; पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली नसून अजित पवार (Ajit Pawar) हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राज्याच्या राजकारणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणं राष्ट्रवादीत फूट असून अजित पवार गटाने शरद पवारांची (Sharad Pawar) अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणं ही फुटच आहे, असं राऊत म्हणाले.

आज माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केली होती. हा पक्षद्रोह होता. त्यामुळं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीतून एक गट फुटला आणि त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षानं बंड करून सत्तेत गेलेल्या नेत्यांची हकालपट्टी केली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या हकालपट्टी करण्यात आली होती. ही फुट नाही तर काय आहे? असा सवाल राऊतांनी केला.

ते म्हणाले, राज्यात आज एकच पक्ष असा आहे, ज्याचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. आज राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुनील तटकरे हे दोन प्रदेशाध्यक्ष आहे. ही फूटच आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणं राष्ट्रवादीत फूटच आहे. पवारांची हकालपट्टी होणं म्हणजे फूटच आहे. आणि लोकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. ईडीच्या भीतीने एक गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीत फूट पडली, हे जनतेला ठाऊक आहे.

.. तर आता पवारसाहेबांनी आम्हाला समर्थन द्यावे; भुजबळांनीही सांगितलं मनातलं 

राऊत म्हणाले, शरद शरद पवार आणि त्यांचे समर्थक ज्या वैचारिक लढ्याचं नेतृत्व करत आला, तो एक गट मविआत आहे. जित पवार कुठं आहेत, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. मविआच्या संदर्भात चर्चा करायची असेल तर आम्ही जयंत पाटील, शरद पवारांसोबत चर्चा करतो. भाजपसोबत गेलेल्यांना महाविकास आघाडीत स्थान नाही.

शरद पवारांचा दोन दगडावर पाय आहे का? असं विचारताच राऊत म्हणाले, मला असं वाटत नाही. भाजपला पूरक अशी त त्यांची वैचारिक भूमिका कधीच नव्हती. त्यांना भाजपचा विचार मान्य नाही. ते फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला मानणारे नेते आहेत. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय संस्कार त्यांच्यावर आहे. त्यामुळं ते भाजपसोबत जाणार नाहीत. मात्र, दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असं कोणाचं राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल, असं राऊत म्हणाले.

Tags

follow us