Download App

Sanjay Raut: शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण…; संजय राऊतांची सडकून टीका

Sanjay Raut On Election Commission: निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (Shivsena) कोणाची आणि राष्ट्रवादी (NCP) कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य…बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील निर्माण झालेला होता. अशी सडकून टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले पक्ष नाही. त्यांनी पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलेले होते. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होतोय.  ‘

देशाचं दुर्दैव आहे की, इलेक्शन कमिशनला कळत नाही की या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे, पण इलेक्शन कमिशनला माहित नाही. पूर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या इतिहासात जे कबिल्यांचा ताबा घ्यायच्या आणि लुटमार करायच्या आणि अशा राजकारणात भाजपने आता देखील टोळ्यात निर्माण केल्या आहेत आणि पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिलं जातंय हे दुर्दैव आहे. इलेक्शन कमिशनने काहीही निर्णय घेऊद्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि पुढे देखील राहील.इलेक्शन कमिशन हे घटनात्मक संस्था आहे पण सध्या पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे आणि पीस देखील जळून गेलेली आहेत, नुसता फडफडतो. असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

…नंतर खुशाल आरक्षण वाढवा; जरांगे पाटलांनी दिला भुजबळांना ‘मास्टर’ फॉर्मुला

कुणीतरी प्रायोजित केलेली व्यक्ती आमच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करत आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवस्था देखील तारीख पे तारीख अशी होऊ नये, यासाठी चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. हे देशातील न्यायव्यवस्थेचं दुर्दैव आहे की, सामान्य माणसाला तारखांवर तारखा देऊन देखील न्याय मिळत नाही हे उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही. कोणाची तरी पिलावळ असते ती आमच्या विरोधात याचिका दाखल करतात. ही सेल्फी नाहीतर सेल्फिश पार्टी आहे. असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

जो निकाल 2024 झाली महाराष्ट्रात लागणार आहे भाजपचा दारुण पराभव. तोच हेच नेते तिकडे जाऊन प्रचार करत आहेत यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही. मध्य प्रदेश मध्ये भाजपचा पराभव होतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून ज्या पद्धतीने आपले सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत. त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. उगाच घोडे कशाला नाचवत आहात, यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

जावेद यांना मी ओळखतो ते सेक्युलर लेखक आहेत. आपल्या मन की बात केली आहे. हा देशाच्या अस्मितेचं प्रतिक आहे. जावेद अख्तर यांनी जे मत व्यक्त केलं आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे.

Tags

follow us