NCP : अहमदनगरमधील कार्यक्रम रद्द; वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन

NCP : अहमदनगरमधील कार्यक्रम रद्द; वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) 9 जूनला अहमदनगरमधील (Ahmednagar) केडगांव येथे होणारा रौप्य मोहत्सवी वर्धापन दिनचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचं चक्री वादळात निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितलं. (NCP Leader Ajit Pawar announced Nationalist Congress Party (NCP) has canceled its silver anniversary program and meeting to be held at Kedgaon in Ahmednagar)

दरम्यान, हा कार्यक्रम आणि सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी मेगा प्लॅन बनविण्यात आला आहे. यासाठी जिल्हा पातळ्यांवरील पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

काय म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसने?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या 10 जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन, नियोजनबद्ध पद्धतीने, मोठ्या जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी केले आहे. पक्षाने नेहमीच विविध उपक्रम आणि धोरणांमधून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्तदेखील तालुका तसेच जिल्हास्तरावर विविधांगी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देऊन ते पूर्णत्वास घेऊन जाण्याची जबाबदारी पक्षातील प्रत्येकाची आहे.

कसे करायचे आहे सेलिब्रेशन?

  1. सकाळी १०.१० वा. गाव, तालुका व जिल्हास्तरावर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन झेंडावंदन करावे.
  2. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित जाऊन महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार घालून अभिवादन करावे व संविधानाचे सामुहिक वाचन करावे.
  3. मराठवाडा स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच इतरत्रही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करावा तसेच हुतात्म्यांचे स्मरण करावे.
  4. “लोक माझे सांगाती” पुस्तक वाटप आपल्या विभागातील डॉक्टर्स, वकील, पत्रकार, सरकारी – अधिकारी, इंजिनियर्स, पोलीस, प्रतिष्ठित व्यक्ति यांना आदरणीय पवार साहेबांवरील “लोक माझे सांगाती” या पुस्तक देऊन त्यांचा सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल सत्कार करावा.
  5. पक्षातर्फे डॉक्टर सेलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित करावेत. युवकांसाठी क्रिकेट, फुटबॉल व इतर क्रिडा स्पर्धा आयोजित कराव्यात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube