Video : …नंतर खुशाल आरक्षण वाढवा; जरांगे पाटलांनी दिला भुजबळांना ‘मास्टर’ फॉर्मुला

  • Written By: Published:
Video : …नंतर खुशाल आरक्षण वाढवा; जरांगे पाटलांनी दिला भुजबळांना ‘मास्टर’ फॉर्मुला

छ. संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट विरोध केला आहे. त्यामुळे आता जरांगे विरूद्ध भुजबळ यांच्यात शब्दीक युद्ध सुरू झाले आहे. EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकतं. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष वेधलं आहे. त्यावर जरांगेंनी उत्तर दिले आहे. ओबीसीत लाभ कमी होणार नसून, आमचं पूर्वीपासून गिळलेलं आरक्षण आहे, ते बाहेर काढायचय. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असे म्हणत सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange On Chagan Bhujbal Reservation Statement)

Lalit Patil : ससूनमध्ये ललित पाटील ऐशोआरामासाठी प्रतिमहिना खर्च करत होता 17 लाख

फराळ खाऊन सह्या करा

आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरू आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी लिखित ठरलय तसा टाईमबाँड द्यावा असे म्हणत हातात ताकद नसेल तर, दिवाळीचा फराळ करून सह्या करा असा सल्ला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवं आहे असा पुनुरूच्चारदेखील जरांगे पाटील यांनी केला आहे.

मग खुशाल आरक्षण वाढवा

ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला भुजबळांनी थेट विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे हा वाद संपण्याऐवजी आणखी वाढल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भुजबळांनी 75 टक्के आरक्षण द्यावे असे विधान केले आहे.त्यांच्या या विधानावर जरांगे पाटलांनी भुजबळांना मास्टर फॉर्मुला दिला आहे.

Balasaheb Thorat : ‘दहशतीसाठी येता, खोट्या केसेस टाकता पण, आम्ही’.. थोरातांनी विखेंना ललकारलं

जरांगे पाटलांचा फॉर्मुला काय?

भुजबळांनी 75 टक्के आरक्षण वाढवण्याच्या विधानावर बोलताना जरांगेंनी आम्हाला OBC मध्ये घ्या आणि तुम्ही 75 च 90 टक्के आरक्षण करा असा मास्टर फॉर्मुला दिला आहे. असं केल्यानंतर आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

मनुष्यबळ वाढवण्याची CM शिंदेंकडे मागणी

आरक्षण देण्याचे गारज दाखवू नका असे कडक बोल उच्चारत आमच्या हक्काच आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे असे म्हणत त्यांनी मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची विनंती केली आहे. मनुष्यबळ वाढवल्यानंतरच 24 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होऊ शकतं असे जरांगेंनी म्हंटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube