Lalit Patil : ससूनमध्ये ललित पाटील ऐशोआरामासाठी प्रतिमहिना खर्च करत होता 17 लाख

  • Written By: Published:
Lalit Patil : ससूनमध्ये ललित पाटील ऐशोआरामासाठी प्रतिमहिना खर्च करत होता 17 लाख

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे. यानंतर आता ऐशोआरामासाठी ललित पाटील (Lalit Patil) खर्च करत असलेला आकडा समोर आला आहे. खर्चाचा हा आकडा ऐकून आणि वाचून अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत. (Lalit Patil Drug Case Update)

Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

ललित पाटीलला भेटायला येत होत्या मैत्रिणी

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील येरवडा कारागृहात तीन वर्ष जेरबंद होता. यापैकी तब्बल नऊ महिने तो वैद्यकीय उपचारांसाठी ससून रूग्णालयात दाखल होता. मात्र, याकाळात त्याला अनेक सोयीसुविधा मिळत होत्या. उपचार सुरू असताना तो अनेकदा रूग्णालयाच्या बाहेर बैठकांनादेखील जात असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ललितवर ज्यावेळी ससूनमध्ये उपचार सुरू होते त्यावेळी त्याला भेटायला मैत्रिणी येत असल्याचेदेखील समोर आले आहे.

World Cup 2023 : पाकिस्तानची टीम बॅगा भरुन तयार; चमत्कारच देऊ शकतो सेमीफायनलचे तिकीट

सोयी-सुविधांसाठी खर्च करत होता लाखोंची रक्कम

एखादा कैदी असताना त्याला अनेक पंचतारांकित सोयी-सुविधा दिल्या जात होत्या. या मिळणाऱ्या सुविधा बघता ललित पाटीलच्या डोक्यावर नेमका कोणाचा हात होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ललित पाटील रूग्णालयात असताना त्याला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी महिन्याकाठी 17 लाख रूपये खर्च करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हॉटेलमध्ये बुक असायची रूम

सोयी-सुविधा मिळण्यासाठी ललित पाटील लाखो रूपये खर्च करत होता. याशिवाय त्याला भेटण्यासाठी अनेकजण ससून रूग्णालयात येत असे. एवढेच नव्हे तर, अनेकदा कैदी असतानादेखील ललित पाटील बैठकांसाठी रूग्णालयातून बाहेर जात होता. तो रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. हॉटेलमध्ये त्याची एक खोली नेहमी बुक असत असेदेखील तपासात उघडकीस आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube