Lalit Patil Viral Photo : ललित पाटीलचे आपल्या मैत्रिणींसोबतचे हॉटेल-रुग्णालयातील फोटो व्हायरल

  • Written By: Last Updated:
1 / 8

Lalit Patil Viral Photo : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. राज्यातील मंत्रीही यचात गुंतले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर पोलिसांना ललितला पकडण्यात यश आलं. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने 21 ऑक्टोबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी (Police custody) सुनावली.

2 / 8

पुणे पोलिसांकडून आपल्याला धोका असल्याचे धक्कादायक विधान केलं. दरम्यान, काल मध्यरात्री पोलिसांनी ललितला मदत करणाऱ्या दोन मैत्रिणींना अटक केली. अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळे अशी त्यांची नावं आहे.

3 / 8

ललितला पळून जाण्यास मदत करणारी अर्चना निकम ही ललितचा मित्र किरण निकमची पत्नी आहे. किरण निकम यांची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती.

4 / 8

तर प्रज्ञा कांबळे हे ललितची प्रेयसी असल्याची माहिती आहे. ती व्यवसायाने वकील असून ललितच्या बऱ्याच व्यवहारात तिचा सहभाग आहे.

5 / 8

ललित येरवडा जेलमध्ये असतांनी ती अनेकदा ललिताच भाऊ भूषण याच्यासोबत येऊन भेटून गेली. पहिल्या पतीसोबत फारकत झालेली नसल्याने ती ललित सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

6 / 8

अर्चना आणि प्रज्ञा यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या महिलांनी आरोपी ललित पाटीलला 25 लाखांची मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

7 / 8

हाती आलेल्या माहितीनुसार, ललित ससूनमधून थेट नाशिकला अर्चनाकडे गेला होता. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर तो सुमारे 20 ते 25 लाख रुपये घेऊन गुजरातच्या दिशेने पसार झाला होता. तो आल्या-गेल्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज अर्चनाने डिलीट केलं होतं. कारण तिला ललितच्या उद्योगाची पूर्ण माहिती होती.

8 / 8

ललित पाटील प्रकरणातील होत असलेल्या खुलाशांनी अनेकांचे धाबे दणाणले. आता पोलिसांनी ललितच्या दोन मैत्रिणींना अटक केल्यानं आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube