Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात (Pakistan) मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले असून आता आणखी एका दहशतवाद्याच्या हत्येने पाकिस्तान हादरला आहे. विशेष म्हणजे हा दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी 2018 ते 2020 पर्यंतच दहशतवाद्यांच्या भरतीचे काम पाहत होता. अकरम खान उर्फ अकरम गाझी असे या कमांडरचे नाव असून त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अकरम खान हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर होता. त्याच्या हत्येने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना संरक्षण मिळत होते असे आता सिद्ध झाले आहे. गाझीची गुरुवारी पाकिस्तानातील बाजौर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Terrorist : पाकिस्तानमध्ये जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या; दहशतवादी दाऊद मलिक ठार

या दहशतवाद्याचा भारतविरोधी कृत्यांत सहभाग होता. पाकिस्तानात याआधी मुफ्ती कैसर फारूख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रविवारी जम्मू काश्मीरातील सुजवान येथे 2018 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ख्वाजा शाहिदचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला.

भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे. नुकतीच या यादीत दोन नवीन नावं जोडली. त्यापैकी एक शाहिद लतीफ होता, तो पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ आहे, याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनीच गोळी घालून ठार केले. त्यानंतर अकरम गाझीच्या रुपाने आणखी एक भारतविरोधी दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

पठाणकोट हल्ल्यातील म्होरक्याचा पाकिस्तानात खात्मा; शाहिद लतीफची गोळ्या झाडून हत्या

याआधी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शाहिद हा अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. या दहशतवाद्याने पठाणकोट हल्यात समन्वयाची भूमिका बजावली होती. त्याचीच आता पाकिस्तानात हत्या करण्यात आली. शाहिद हा भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. पाकिस्तानातील सियालकोट परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या, असे सांगण्यात येत आहे. शाहिद 41 वर्षांचा होता. त्याने 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट येथील हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानेच या हल्ल्याचे समन्वय केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube