‘400 च काय 200 जागाही अशक्य, प्रभू श्रीराम भाजपाला माफ करणार नाही’; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीशी (Nitish Kumar) फारकत घेत भाजपाशी घरोबा केला. दोन दिवसांपू्र्वी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. आता त्यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीयू सरकार सुरळीत सुरू झाले आहे. दुसरीकडे मात्र नितीश कुमार यांच्या या राजकारणाचा विरोधी पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही ठाकरे गटाचे खासदार संजय […]

Sanjay Raut

Sanjay Raut

Sanjay Raut : नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीशी (Nitish Kumar) फारकत घेत भाजपाशी घरोबा केला. दोन दिवसांपू्र्वी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. आता त्यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीयू सरकार सुरळीत सुरू झाले आहे. दुसरीकडे मात्र नितीश कुमार यांच्या या राजकारणाचा विरोधी पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत. “नितीश कुमारांना फोडा, शिवसेना तोडा.. हेमंत सोरेन-केजरीवाल (Hemant Soren) यांच्यावर छापे टाका, ही नाटकं का सुरू आहेत? आता 400 च कशाला 200 जागा सुद्धा तुम्ही पार करू शकणार नाहीत. या निवडणुकीत नक्कीच तु्मचा पराभव होणार आहे. प्रभू श्रीरामही भाजपला माफ करू शकणार नाही”, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले, ईडी ही संस्था भाजपाची एक शाखा आहे. दोन अडीच वर्षात आम्ही जे काम केलं ते पूर्ण देशात कधीच झालं नाही. दोन पाच लाखांची चौकशी करण्याचं काम ईडीचे आहे का? ईडीची पातळी एवढी घसरली आहे का? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले. कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करून लोक भाजपमध्ये जात आहेत. त्यावेळी मात्र तपास यंत्रणा मूग गिळून गप्प बसतात. पण, आम्ही घाबरणारे नाही तर लढणारे आहोत. काय कारवाई करायची ती करा, असा इशारा राऊत यांनी दिला.

लोकसभेच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचा दावा; संजय राऊतांची तोफ नगरमध्ये धडाडणार

महाविकास आघाडीत मतभेद नाहीत 

महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात योग्य पद्धतीने आणि सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. त्यांनाही चर्चेला बोलावण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्याबरोबर देखील आमची चर्चा सुरू आहे. जे ज्या भागातून लढणार आहेत ती जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच चर्चा करू असे राऊत म्हणाले.

खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी भाजप आणि शिंदे गटात

खिचडी घोटाळा जर झाला असेल तर त्यातले सगळे लाभार्थी हे भाजप आणि शिंदे गटात आहेत. ज्यांनी पैसे घेऊन सुद्धा खिचडी वाटप केली नाही. यातील काही जणांचं वर्षा आणि देवगिरी बंगल्यावर केटरिंग चालू आहे. आमच्या सूरज चव्हाणला अटक केली मात्र त्यांना हात लावत नाहीत असा आरोप राऊत यांनी केला.

ठाकरे गट रणशिंग फुकणार…संजय राऊतांच्या उपस्थितीत नगरमध्ये महामेळावा

Exit mobile version