लोकसभेच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचा दावा… संजय राऊतांची तोफ नगरमध्ये धडणार

लोकसभेच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचा दावा… संजय राऊतांची तोफ नगरमध्ये धडणार

Ahmednagar LokSabha Elections : आगामी काळात होणारे लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Election) अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. यातच नेते मंडळकडून भेटीगाठी घेणे तसेच दौरे देखील सुरू झाले आहे. नगर दक्षिण लोकसभा व उत्तर लोकसभेसाठी ठाकरे गटाची (Shivsena) तयारी असून या दोन्ही जागेसाठी आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटाचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी दिली. याबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे दिला असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणारा असून त्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे हे देखील उपस्थित होते. निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचे भाष्य देखील केले. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुका असल्याने ठाकरे गटाकडून नगर दक्षिणसाठी व उत्तरेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या निकालाच्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत वरिष्ठांकडे मागणी केली आहे याबाबतचा अहवाल देखील सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. आजच्या घडीला उत्तरेची जागा जशी आमच्याकडे आहे तसेच दक्षिणेची जागा देखील राहावी अशी मागणी आम्ही केली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईच्या विकासात उत्तर भारतीयाचं मोठं योगदान; राज्यपाल बैस यांचं मोठं विधान

दक्षिण लोकसभेसाठी आमच्याकडे ताकतवान उमेदवार असून अनेक उमेदवार आमच्याकडे येण्यास देखील इच्छुक असल्याचे देखील यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्या पक्षातील नेते आपल्या संपर्कात असल्याचे विचारण्यात आले असता ते म्हणाले की येत्या काळात जे कोणी ताकदवान उमेदवार येतील ते कोणत्या पक्षाचे आहे हे लवकरच स्पष्ट होईल असं देखील शिंदे म्हणाले.

सध्या लोकसभा टार्गेट
शिंदे यांनी नगर दक्षिणेमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी हा मेळावा होत आहे असे सांगितले. यावेळी त्यांना नगर आणि पारनेरमध्ये अनेक वर्ष शिवसेनेचे आमदार होते मात्र 2019 मध्ये एकही आमदार नगर जिल्ह्यामध्ये निवडून आलेला नाही, त्याचबरोबर नगर आणि पारनेर येथील आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार आता महायुतीमध्ये अजित पवार गटात आहेत.

‘हिरे बाजार सूरतला नेण्याचा डाव फसला, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच…’, आव्हाडांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

या परिस्थितीत शिवसेनेची भूमिका विचारली असता त्यांनी, आम्ही सध्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून खासदार राऊत यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. आम्ही शिर्डी लोकसभा मतदार संघासह नगर दक्षिण मतदार संघावरही आमचा दावा असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नगर आणि पारनेरमध्ये त्याचबरोबर अजून जागेवर शिवसेना उमेदवारीचा दावा करणार असल्याचं स्पष्टपणे आमदार शिंदे यांनी सांगितले.

दक्षिणेवर दावा पण उमेदवार कोण?
यावेळी संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी दक्षिण नगर दक्षिण लोकसभेवर दावा दाखल करताना आमच्याकडे तीन प्रबळ उमेदवार यासाठी असल्याचाही सांगितले. मात्र हे तीन उमेदवार कोण याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली नाही. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यात इतर पक्षातून शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली.

मनोज जरांगे हे मनुवादी, मुंबईच्या आंदोलनात घातपात…; उपराकार लक्ष्मण मानेंचे धक्कादायक दावे

त्यामुळे शिवसेनाच्या मेळाव्यात लोकसभेचा प्रबळ उमेदवार पक्षप्रवेश करणार का? याची उत्सुकता आता दिसून येत आहे. मात्र नगर दक्षिणेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असून त्यांचाही उमेदवार आत्तापर्यंत अंतिम झालेला नाही. अशात नगर दक्षिणेतील जागेवर शिवसेनेने दावा केल्याने आता मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे.

रामदास आठवले शिर्डी लोकसभा लढवणारच…तयारी झाली; साळवेंनी स्पष्ट सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज