सरकार महाराष्ट्र पेटवतंय, पोलिसही सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते; मीरा भाईंदर प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल

  • Written By: Published:
सरकार महाराष्ट्र पेटवतंय, पोलिसही सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते; मीरा भाईंदर प्रकरणावरून आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला रात्री ठाण्यातील  (Meera Bhayander Riot) परिसरात राडा झाला होता. नयानगर परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. हैदर चौकातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा चालवण्यात आलं. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी भाष्य केलं.

CM शिंदे रमले शेतात, रोटरही चालवला; म्हणाले, ‘मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो’ 

आज माध्यमांशी बोलतांना आव्हाडांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मीरा – भाईंदर घटनेविषयी आव्हाडांना विचारले असता ते म्हणाले की, बांधकामावर बुलडोझर चालवला ही कारवाई योग्य नाही. महाराष्ट्र हा शांततप्रिय आहे. हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे. असं असतांना राज्यात दंगली होतात, ही बाब लाजिरवाणी आहे. हे कृत्य कोणीही केलं असतं तरी याचा त्रास सामान्य माणसांना होतो. पोलिसांनी पोलिस म्हणून भूमिका पार पाडावी. मात्र, पोलिस हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते झाल्यासारखं वाटतं आहे.

Gavran Meva मध्ये ‘प्रभु श्रीरामां’चा सोहळा; पण गणप्याला नेमकं काय झालं? 

आव्हाड म्हणाले, शासनाला दंगल घडवण्याची प्रचंड इच्छा झाली. राजकीयदृष्ट्या आपण समाजावर इंप्रेशन पाडून शकत नाही हे लक्षात आल्यावर दोन धर्मात भांडणं लावण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. दंगल झाली त्या भागात अद्याप मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. तिथले आमदार म्हणतात फक्त पाच मिनिटं द्या. ही भाषा एक आमदार करतो, हे भयानक आहे. मी दोन्ही समुदायाला आव्हान करतो, असल्या राज्यकर्त्यांना बळी पडू नका. कारण, यात आपल्याच गोरगरीब बांधवांची घर जळतात. लढवत आहेत ते कधीच मरत नाहीत, असं आव्हाड म्हणाले.

ते म्हणाले, मिरा भाईंदरमध्ये असं कधीच झालं नाही. मात्र, आता राज्याच्या प्रत्येक भागात असा तणाव तयार होतो. प्रत्येक दोन गटात सरकार वैमन्स करत आहे. सरकार महाराष्ट्रात आगी लावण्याचं का करत आहे. पेटण्याचं काम करत आहे. महाराष्ट्र पेटवण्याचं काम सरकारने करू नये.

सत्याचा विजय होईल
रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना ईडीचं समन्स आलं. याविषयी विचारलं असता आव्हाड म्हणाल, एजन्सचीचा वापर राजकारणालसाठी करणं हे मुलभूत अधिकारांना धक्का देणार आहे. लोकांना घाबरण्यासाठी ईडीचा वापर करणं चुकीचं आहे. आज रोहितला बोलावलं. उद्या आणखी कोणाला बोलावतील. सुज्ञ जनतेला हे पटणार नाही. सध्या रोहितची चौकशी सरू आहे. सत्याचा विजय होईल. ते लवकरच सुटतील, असं आव्हाड म्हणाले.

वंचित आमचा मित्रपक्ष – आव्हाड
वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही. त्याबाबत विचारले असता आव्हाड म्हणाले की, वंचितबाबत माझं आणि पवार साहेबांचं काहीच तासापूर्वी बोलणं झालं. आम्ही वंचित सोबतचं निवडूक लढवणार आहे. वंचित आमचा मित्रपक्ष आहे, असं आम्ही मानतो. त्यांना सोबत न घेता आम्ही निवडणूका लढणार नाहीत, असं आव्हाड म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube