Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे दरवाजे बनवणाऱ्या MD ची घेण्यात आली होती परीक्षा

  • Written By: Published:
Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे दरवाजे बनवणाऱ्या MD ची घेण्यात आली होती परीक्षा

Ram Mandir Gold Door : अयोध्येतील राम मंदिराच (Ram temple) स्वप्न सत्यात उतरत आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचे कामही सुरू आहे. या दरवाज्यांवर सोन्याचा मुलायमा चढवण्यात आला आहे. या दरवाज्याचे काम अनुराधा टिंबर इंटरनॅशनलने (Anuradha Timber International) केलं आहे. त्यासाठी या कंपनीच्या एमडींची मुलाखतही घेण्यात आली होती.

‘एक किंवा दोन अपत्यांवर थांबा नाहीतर लोकसंख्या वाढली की’.. अजित पवारांची जोरदार फटकेबाजी 

याबाबत अनुराधा टिंबर इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक शरद बाबू म्हणाले की, आम्हाला राम मंदिराचे दरवाजे बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आम्ही हे काम फार कमी वेळात पूर्ण केलं. हे दरवाजे नगारा शैलीमध्ये बनवण्यात आले.

शरद बाबूंनी सांगितले की, 3 वर्षांपूर्वी चंपक राय यांनी दरवाजाच्याचे एक मॉडेल बनवण्यास सांगितले होते, आम्ही मंदिरात सध्या बसवलेल्या दरवाज्यासारखे मॉडेल बनवले होते आणि ते राम नवमीच्या वेळी अयोध्येत आणले होते. ते म्हणाले, गेल्या वर्षी जूनमध्ये अनेक मुलाखतीनंतर आम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात आले, तेव्हापासून आम्ही दरवाजे बनवण्याचे काम सुरू केले. ,गेल्या सहा महिन्यांपासून येथे दिवसरात्र काम सुरू आहे. सुमारे 60 कारागीर या कामात गुंतलेले आहेत. येथे शिफ्ट पद्धतीने काम सुरू आहे. गर्भगृह, मंडप आणि सिंहासह 14 दरवाजे सोन्याने मढवलेले आहेत.

बिहारपाठोपाठ आंध्र-प्रदेशचाही मोठा निर्णय : लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘मास्टर स्ट्रोक’ 

तिजोरीसाठी स्वतंत्रपणे चार दरवाजे बनवण्यात आल्याचंही शरद बाबूंनी सांगितलं. त्यांच्या कंपनीने राम मंदिराचे एकूण 18 दरवाजे बनवले आहेत. मंदिराचा वरचा भाग बांधला जाईल, तेव्हा त्याच्या दरवाजाचे कामही आपल्याला मिळेल, असे ते म्हणाले. दारवाज्यांमध्ये सागवान लाकडाचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शऱद बाबूंनी दावा केला की या दरवाजांना 1000 वर्षे काहीही होणार नाही, कोरीव काम आणि नक्षीकाम अतिशय तपशीलवारपणे केले गेले आहे.

त्यांनी सांगितले की, गाभाऱ्यात बसवलेला दरवाजा 12 फूट रुंद आणि 9 फूट लांब आहे. दरवाजाची जाडी 5 इंच आहे. इतर सर्व दरवाजे 9 ते 10 फूट वेगवेगळ्या उंचीचे आणि 5 इंच जाडीचे आहेत.

शरद बाबू म्हणाले, दरवाज्यांवर संपूर्ण नक्षीकाम आम्ही केले असून डिझाइन सोनपूर येथून घेतले. गाभाऱ्याच्या दरवाजाची रचना वेगळी आणि इतर दरवाजांची रचना वेगळी आहे. दरवाज्यांवर गजराज कोरलेले आहेत. त्यात कमळ आणि देवांच्या मूर्तीही आहेत. ते म्हणाले की हे सर्व आम्ही हाताने कोरले आहे. बाहेरील दरवाजांवर स्वस्तिक आणि आतील बाजूस अप्रतिम गजराज आणि देवता मूर्ती आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube