Sanjay Raut Criticized PM Modi : ‘मोदींचा परिवार तर तुम्ही पाहिलाच असेल. इलेक्टोरल बाँडच्या (Electoral Bond) माध्यमातून ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या तेच लोक मोदीजींचा परिवार आहेत. आम्ही गरीब लोक कुठे त्यांच्या परिवारात येतो. फार्मास्युटिकल कंपन्या, ठेकेदार हा त्यांचा मोठा परिवार आहे. मोदीजी आणि त्यांचा पक्ष देणग्या देणाऱ्या लोकांसाठीच काम करते. बाकी आम्ही तर गरीब लोक आहोत. नवीन सरकार येईल तेव्हा आमच्यासारख्या गरीबांचं कल्याण होईल’, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर टीका केली.
देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या बाँडच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपालाच सर्वाधिक पैसा मिळाल्याचा दावा करत विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, फार्मास्युटिकल कंपन्या, ठेकेदार हा त्यांचा मोठा परिवार आहे. मोदीजी आणि त्यांचा पक्ष देणग्या देणाऱ्या लोकांसाठीच काम करते. बाकी आम्ही तर गरीब लोक आहोत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसचे नेते दिल्लीतून आले होते. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. वंचित बहुजन आघाडी हा एक महाविकास आघाडीतील महत्वाचा घटकपक्ष आहे. चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला आहे. त्यांनी आम्हाला ज्या 27 जागांची यादी दिली होती त्यातील चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. आता आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही या प्रस्तावावर विचार करा. आता त्यांच्याकडून आम्हाला कळलं पाहिजे की हा प्रस्ताव त्यांना मान्य आहे का, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
वंचितशिवाय जागावाटप होणारच नाही; संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं