Sanjay Raut Criticized PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी (PM Modi in Nashik) काळाराम मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसरात साफसफाई केली. मंदिरातल स्वच्छतेचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातूनही दिला. मात्र, विरोधकांना मोदींचा हा संदेश पचनी पडलेला दिसत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या या साफसफाई मोहिमेवर सोशल मीडियावर पोस्ट लिहित खोचक टीका केली. मोदींनी केलेल्या साफसफाईची खरंच गरज होती का असा सवाल उपस्थित करत सरकारने सफाईवर केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेले अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला..
पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते.त्यांनी मंदिर एकदम चका चक केले..या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले.
मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च… pic.twitter.com/8kZ5YhRS7k— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2024
‘आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते पाच दिवसांपासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च केले. मंदिर ट्रस्टने देखील सफाईवर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉप घेऊन सफाई दर्शन केलेच! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाईवर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेले’, अशी खोचक टीका राऊत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली आहे.
PM Modi : ‘आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका, नशा करू नका’ पीएम मोदींचं युवकांना आवाहन
दरम्यान, पीएम मोदींनी नाशिक येथील भाषणात युवकांना मार्गदर्शन केले. अमृतकाळात भारताला नव्या उंचीवर नेण्याचा काम युवकांना करायचे असून, भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थेत समाविष्ट झाल्याचे सांगितले. तसेच तरूणांसाठी भाजप सरकारने विविध योजना सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, युवकांसाठी आमच्या सरकारने नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेल्या सरकार पेक्षा तिप्पट काम आमच्या सरकारने केलं दहा वर्षात युवकांना मोकळा आभाळ मिळालं.
भारतातील विमानतळ जगातील इतर मोठ्या विमानतळा इतकी सक्षम बनवली. चंद्रयान, आदित्य एल वन, डिजिटल पेमेंट, इंटरनेटचा सहज एक्सेस, अशा अनेक सुविधांचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. तसेच आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आपल्याला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायचं आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तरुणांनी असे काम करा की पुढील काळातील पिढी तुमची न चुकता आठवण काढेल. असं आवाहन करत मोदींनी जोशपूर्ण उदाहरणं देत तरूणांना ‘बूस्टर’ दिला.
PM Modi : श्रीराम मंदिरासाठी PM मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान; आज नाशिकच्या पंचवटीतून सुरुवात