Sanjay Raut : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाच्या घवघवीत (Election Results 2023) यशाने इंडिया आघाडीला (INDIA Alliance) जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष अस्वस्थ झाले आहेत. याच अस्वस्थेतून त्यांच्यात नाराजीही वाढली आहे. या निकालानंतर आज दिल्लीत आघाडीची बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. बैठक कधी होईल हे अद्याप निश्चित नाही. त्यातच आता पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. हाच प्रश्न प्रसारमाध्यमांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारला. त्यावर राऊत यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.
राऊत म्हणाले, या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. पण, अजून काहीच निर्णय झालेला नाही. इंडिया आघाडी ही देशातील विरोधी पक्षांची एकजूट आहे. ही एक महाआघाडी आहे. यात हुकूमशाही नाही. येथे चर्चा होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एनडीए आघडी होती. त्यावेळी सुद्धा चर्चा करूनच निर्णय घेतले जात होते. आताची एनडीए आघाडी वेगळी आहे. मात्र इंडिया आघाडीत चर्चा होते. चर्चेला प्राधान्य दिले जाते. इंडिया आघाडीचा चेहरा असावा हा मुद्दा योग्यच आहे. यात काही दुमत असण्याचं कारण नाही. या मुद्द्यावर आघाडीच्या पुढील बैठकीत नक्कीच चर्चा करू, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठी विचार होऊ शकतो का, असा प्रश्न विचारला असता राऊत हसले. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हा हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी चेहरा आहे. इंडिया आघाडीत ज्या व्यक्तीच्या नावाला सर्वाधिक संमती असेल तोच उमेदवार ठरेल असे वाटते. मात्र सध्या या मुद्द्यावर कोणतंही भाष्य करणार नाही ज्यामुळे आमच्या इंडिया आघाडीत मतभेद निर्माण होतील.
इंडिया आघाडीत धुसफूस वाढली
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत धुसफूस वाढली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम