Sanjay Raut : ‘काँग्रेसचा विजय म्हणजे ‘इंडिया’चा विजय, 2024 नंतर उलटे चक्र फिरेल’; राऊतांनी भाजपला डिवचलं

Sanjay Raut : ‘काँग्रेसचा विजय म्हणजे ‘इंडिया’चा विजय, 2024 नंतर उलटे चक्र फिरेल’; राऊतांनी भाजपला डिवचलं

Sanjay Raut : पाच राज्यांतील विधानसभांसाठी मतदान झाल्यानंतर काल निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Polls 2023) आले. या निवडणूक अंदाजात अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होताना दिसत आहे. याच अंदाजावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. मात्र, तशी घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांनी घाम फोडला. राजस्थानसह चारही राज्यात इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. 2024 नंतर उलटे चक्र सुरू होणार आहे. काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला डिवचले.

Exit Poll 2023 : मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर; सहापैकी या एक्झिट पोलने दिली बरोबरीची आकडेवारी

राऊत म्हणाले, सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू. पाच राज्ये अत्यंत महत्वाची आहेत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगाणा, मिझोरम पण या एक्झिट पोलवर चर्चा करण्यापेक्षा 3 डिसेंबरला ज्यावेळी निकाल लागतील त्यावेळी यावर बोलू. या पाच राज्यातील परिवर्तनाची दिशा 2024 ला दिल्लीतील सत्ता परिवर्तनाकडे जाणार आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसनं वादळ निर्माण केलं आहे ही 2024 च्या परिवर्तनाची झलक आहे. कांटे की टक्कर होतेय हीच मोठी गोष्ट आहे, असे राऊत म्हणाले.

एका एका राज्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांना मुक्काम ठोकावा लागतोय. या राज्यांमध्ये काट्याची टक्कर होतेय. हे देखील भाजपसाठी मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या विजयी होणाऱ्या उमेदवारांसाठी हॉटेल्स बुक केली जात असल्याचा आरोप होत आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील आमदारांना गुवाहाटीत घेऊन गेले होते. तेथे वेगळे काय झाले. विजयी उमेदवारांच्या सुरक्षेसाठी असे काही होत असेल तर त्यात गैर काही नाही. तसे झाले नाही तर तुमचे ईडी आणि सीबीआयवाले तिथे घुसतील असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : ‘आता एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करा’; दळवींच्या अटकेवर राऊत भडकले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube