Download App

Sanjay Raut : अजितदादा नाही ही भाजपाचीच स्क्रिप्ट; शरद पवारांसाठी राऊत मैदानात

Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्तरे दिल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचे आरोप म्हणजे ही भाजपाचीच स्क्रिप्ट होती, असे राऊत म्हणाले.

राऊत यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे बोलत आहेत. खोटे आरोप अल कायदा जसे काम करत होती तसे आता भाजप करत आहे. भाजपनं पक्ष आणि घर फोडले. आता नेते तुटत नाहीत म्हटल्यावर चारित्र्यावर हल्ला केला जात आहे.अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजितदादा नाही तर भाजपच बोलत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे राज्याच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. मात्र याच पक्षांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. परंतु, ते काही असलं तरी राज्यातली जनता आमच्याबरोबर आहे. आगामी काळात राज्यात आणि देशात आमचं सरकार येईल, असे राऊत म्हणाले.

Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

अजित पवार यांनी या भाषणात लोकसभा निवडणुकीत बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या चार जागा लढणार असल्याची घोषणा केली होती. यावरही राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संपवण्याचे षडयंत्र भाजपाकडून रचलं जात आहे. संघाचं हे कपट कारस्थान आहे. यानंतर त्यांनी प्रफुल पटेल यांनी केलेल्या दाव्यावरही उत्तर दिले. 2004 मध्येच भाजप राष्ट्रवादी युती झाली असती, असे पटेल म्हणाले होते. त्यावर राऊतांनी पटेलांवर जोरदार पलटवार केला. शरद पवार साहेब गेले का कुठे ? पवार साहेब पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आरोप म्हणजे भाजपाचीच स्क्रिप्ट आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले होते अजित पवार ?

शरद पवारांच्या (Sharad Pawar) आदेशानेच राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच झाला होता. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिल्याचं अजित पवार म्हणाले होते.

Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Tags

follow us