Download App

Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला

Image Credit: letsupp

Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहेत. आपापल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, फक्त एकच पक्ष राहिल तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्ष संपवून टाकू अशी भाजपची भाषा होती. पण, त्याच नड्डांना (JP Nadda) आता लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. लहान पक्षांना सोबत घेत पुन्हा एनडीएची उभारणी करावी लागत आहे. देशातील लोकशाही नष्ट करण्याता भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : एकनाथ शिंदे भाजपचे नोकर, आज बाळासाहेब असते तर.. राऊतांचा हल्लाबोल

यानंतर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. देशात लोकशाही आहे. त्यामुळे इतर पक्ष संपवणे शक्य नाही. बावनकुळे सांगतात लहान पक्ष संपवा पण, 2024 मध्ये तुमचा पक्ष राहतो की नाही ते आधी पाहा. 2024 नंतर देशात भाजप राहणार नाही तो काँग्रेसय झालेला पक्ष आहे. आम्ही जर ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल. त्यांच्याकडील 303 खासदारांपैकी 103 खासदारच फक्त मूळ भाजपचे आहेत. बाकीचे खासदार तर काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षांचे आहेत. जर या सर्व खासदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला तर देशच भाजपमुक्त होईल, असा खोचक टोला राऊत यांनी बावनकुळेंना लगावला.

शिंदे भाजपाचे गुलाम आणि नोकर 

शिंदे यांना तेव्हा काय स्थान होते, तेव्हा ते पक्षाचे नेते देखील नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आता केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शहा यांनी सांगावे. अमित शहा बाळासाहेबांच्या खोलीत गेले होते की नाही हे आमित शहा यांनी सांगावे.त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेते होते. एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाले आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य करत आहेत, अशी खरमरीत टीका राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

नड्डांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला; संजय राऊतांनी डिवचलं

follow us

वेब स्टोरीज