‘फक्त 40 तासांत राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांचा निकाल’; राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं (Maharashtra Politics) काय होणार?, या बराच काळापासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात निर्णय घेतला जाईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T174710.592

Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं (Maharashtra Politics) काय होणार?, या बराच काळापासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात निर्णय घेतला जाईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) येत्या आठवड्यात कारवाईला सुरुवात करतील अशी शक्यता आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.

राहुल नार्वेकरांनी निकाल लावायला एक वर्ष घेतलं. 40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे आहेत. घटनेतून निकाल लावायचं काम करायचं आहे. चिन्हावर निवडून आले आणि फुटून बाहेर गेलेत. 10 शेड्यूलनुसार निर्णय द्यायचा आहे. घटनेतील 10 व्या शेड्यूलनुसार राहुल नार्वेकरांना या प्रकरणात निर्णय घ्यायचा आहे. त्यांना जर घटनाच माहिती नसेल तर आम्ही तज्ज्ञ पाठवू. 40 तासांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा निकाल लागू शकतो पण, त्यांना लावायचा नाही. फालतू राजकारण करून महाराष्ट्राला अस्थिर करत आहेत, असा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Maharashtra Politics : CM शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार? मोठी अपडेट मिळाली

14 सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात

या प्रकरणाची सुनावणी 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सुनावणीसाठी दोन्ही गटांना (Maharashtra Politics) नोटीस बजावण्यात सुरूवात झाल्याचे समजते. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांकडून मिळाली. आता या सुनावणीत सर्व आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईतून बचाव करण्यासाठी युक्तिवादही करावा लागणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी होईल.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले होते. या उत्तरांची आणि पुराव्यांची छानणी करण्यात आली आहे. अध्यक्षांनी पुढील आठवड्यात सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील (Maharashtra Politics) आमदारांना नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.

मोठी बातमी : सरकारचा प्रस्ताव मान्य नाही; उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांंगे

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता ?

याआधी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला निर्णय (Maharashtra Politics) देत तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सांगितले होते. यानंतर राहुल नार्वेकर लवकर निर्णय घेतील असे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हा निर्णय झालेला नाही. अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी विरोधकांकडूनही दबाव आणला जात होता. यानंतर आता अखेर या प्रकरणात सुनावणी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आमदारांची सुनावणी होऊन विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version