Shivsena MP Sanjay Raut Warns MNS Workers : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत (Elections 2024) आहेत. याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बीड दौऱ्यात त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाहनांवर बांगड्या फेकल्या. दोन्ही पक्षांत हे नवं युद्ध सुरू झालेलं असतानाच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; संतप्त कार्यकर्त्यांनी मनसेचे बॅनर फाडले, व्हिडिओ व्हायरल
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल ठाण्यात मनसे आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यावर संताप व्यक्त केला. राऊत म्हणाले, काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं ठाण्यात ठिकठिकाणी स्वागत झालं. सभागृहही भरगच्च होतं. भगवा सप्ताह ठाण्यात साजरा झाला. काय झालं माहिती नाही. ते कुणाचे कार्यकर्ते होते ते दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे लोक होते.
बीडमध्ये मनसे प्रमुखांसोबत काल जो प्रकार झाला त्यात शिवसेनेचा काहीच संबंध नव्हता असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. तरीही काल अॅक्शन रिअॅक्शन करण्याचा प्रयत्न झाला असेल तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तु्म्ही वाचले असाल. मर्दाची औलाद असता तर समोर आला असतात. आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पुन्हा असे कृत्य करू नका.
तुमच्या घरात तुमचे आई वडील, मुलंबाळं वाट पाहतात. अहमद शहा अब्दाली सुपारी देऊन मजा पाहत आहे. राज्यातील तीन नेत्यांना त्यांनी सुपारी दिली आहे. सुपारी कशी वाजवली जाते हे तुम्ही पाहिलंच आहे. तुमच्याकडून कुणीतरी हा प्रकार करवून घेत आहे. दिल्लीचा अब्दाली हे सगळं घडवून आणत आहे. तुमचा नेता सुपारी घेऊन तुम्हाला मारामाऱ्या करायला लावतो. तुमचा वापर होतोय. तुमच्यासाठी हे योग्य नाही इतकं लक्षात ठेवा असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य, फ्रस्ट्रेशनमधून आरोप, सुषमा अंधारेंचा प्रत्युत्तर