राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य, फ्रस्ट्रेशनमधून आरोप, सुषमा अंधारेंचा प्रत्युत्तर

राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य, फ्रस्ट्रेशनमधून आरोप, सुषमा अंधारेंचा प्रत्युत्तर

Sushma Andhare On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या नादाला लागू नये असा थेट इशारा दिला आहे. संभाजीनगरमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझा मोहोळ उठला तर तुम्हाला निवडणुकीसाठी साधी सभाही घेता येणार नाही असं म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये असा इशारा त्यांनी दिला होता.

तर आता राज ठाकरे यांनी केलेला आरोप फक्त नैराश्यतून असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) केला आहे. आज सुषमा अंधारे अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चा बाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांच्या अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामधून ते फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य त्यांनी केले असेल. अशी टीका पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

आमच्यामध्ये रस्सी खेच नाही

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांशी बोलताना ज्या पक्षाचे जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं म्हटले होते. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल मी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एकत्रच होतो आणि त्यावेळी त्यांनी देखील सांगितले की आमच्यामध्ये छोटा भाऊ-मोठा भाऊ याचा रस्सी खेच नाही आहे. सध्या जागावाटपाची प्राथमिक बैठक पार पडली आहे. कोणता पक्ष कोणती जागा आणि किती जागा लढवणार आहे हे 25 ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल. असं देखील यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी बच्चूकडू आणि शरद पवार भेटीवर देखील भाष्य केले आहे.

बच्चूकडू यांनी शरद पवार यांनी भेट घेऊन तब्बल पाऊणतासांहून अधिकवेळ चर्चा केली आहे. ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, या भेटीवर मला काही कल्पना नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. बच्चूकडू यांनी कोणावर टीका करण्याची कोणावर नाही हे त्यांचा प्रश्न आहे. असं देखील यावेळी अंधारे म्हणाल्या.

वसुली भाई राहिलेलो नाही

तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या, काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते त्यापैकी एक नरेश म्हस्के एक आहेत. म्हस्के हे खासदार झाले किंवा त्यापेक्षा पण त्यांना काही मिळाले तरी त्यांची बौद्धिक ऐपत आहे ती अजूनही चिंधी चोरखी आहे ती काय वाढत नाही आहे.

Paris Olympics 2024 : स्वप्न भंगले, रितिका हुड्डा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

नरेश म्हस्के आपण आता वसुली भाई राहिलेलो नाही, आता आपण खासदार झालोय, त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. असं म्हणत नरेश म्हस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात ते एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता बांधील नाही. म्हस्केनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणचे स्वतः च आरशात बघून केलेलं स्टेटमेंट आहे. अशी टीका सुषमा अंधारे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube