शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; शिंदे गट बाजू मांडणार

shivsena party symbol case शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाकडून बाजू मांडली जाणार.

Shivsena Party Symbol Case

Shivsena Party Symbol Case

Shivsena Party Symbol Case: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी! परवानगी नाकारली तरी, जरांगे आज मुंबईकडे कूच करणार

या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने करण्यात येणारा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून करण्यात येणाऱ्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून विविध कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहेत.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव

आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात आणि न्यायालयाकडून काय निरीक्षण नोंदवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील या सुनावणीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Exit mobile version