Download App

फडणवीसांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का?, राऊतांची बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले असून त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आम्हाला ठाऊक असल्याचं सांगितलं. जरांगेंच्या आरोपानंतर भाजप नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे जरांगेंचा बोलवता धनी शरद पवारांचं असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) फडणवीसांवर जोरदार टीका केली.

Prerna Arora: प्रेरणा अरोराच्या ‘डंक- वन्स बिटन, ‘ट्वाईस शाई’चा फर्स्ट लुक रिलीज 

आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना राऊतांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीस यांना माहित नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. हे सर्व घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून वेगळं राजकारण करायचं आहे का? हे तुम्हाला माहित नसेल तर तुमच्याकडे गृहमंत्रीपद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का, असा सवाल राऊतांनी केला.

Tiger Shroff: वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले चाहत्याचे मन

पुढं बोलतांना ते म्हणाले की, जरांगे पाटील यांच्याविषयी माहिती असेलच. त्यांचे फोन वगैरे टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांना बसवलं. त्या अनुभवी आहेत. कोण कोणाशी बोलतंय आणि कोण कोणाला पाठिंबा देतोय हे रश्मी शुक्लांना माहीत असतं. त्यामुळे गृहमंत्र्यांनी अनुभवी डी.जी. रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा केली पाहिजे. यामागे बोलवता धनी कोण आहे? फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? ते काही काड्या लावतात का? महाराष्ट्राला पेटवायला निघाले आहेत का? ही माहिती गृहमंत्र्यांना नसेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे, असंही राऊत म्हणाले.

मनोज जरांगेंची भाषा शिवराळ असल्याचा आरोप होतोय. त्यावरही राऊतांना भाष्य केलं. ते म्हणाले की, जरांगे पाटील आता जी भाषा बोलत आहेत ती बहुधा त्यांनी भाजपकडून घेतली असेल. जरांगे पाटील साधे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भाषेकडे लक्ष देऊ नका. भावना समजून घ्या. भाजपमधील सुशिक्षित आणि कडक इस्त्राचे नेते, त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या. एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची, खतम करण्याची भाषा आहे. भाषेची संस्कृती, संस्कार कोणी बिघडवला असेल तर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भापजच्या एका टोळीने बिघडवलाय. फडणवीस यांच्या कडे सुत्र गेल्यानंतर महाराष्ट्राची अवस्था खराब झालीये, अशी टीका राऊतांनी केली.

यावेळी राऊतांनी अजित पवार, फडणवीस शिंदेवरही टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांनी लिहिले, विकासासाठी ते मोदींकडे गेले. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना समुद्रात डुबकी मारून स्कुबा डायव्हिंग करावं लागेल. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील, तिघेही मोदींची फॉलोअर्स आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

follow us