Vinayak Raut : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) आता अवघे दोन-अडीच महिने शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत जागावाटप उशीरा झाल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. काल ठाकरे गटाने मुंबईत 25 जागा मागितल्याची चर्चा होती. ती चर्चा थांबत नाही तोच सोलापुर दौऱ्यावर आलेले माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी 130 जागांवर दावा केला आहे.
पवार अन् ठाकरेंचा पक्ष प्रादेशिक तर आप ठरला राष्ट्रीय पक्ष; निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय!
विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाचा सोलापुरात मेळावा झुाला. त्या मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले की, सोलापूर जिल्हा हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राज्यातून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट प्रयत्नशील आहे. ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. इंडिया आघाडीबरोबर शिवसेना ठाकरे गट विधानसभा निवडणूक लढवणार आणि प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपात पारंपारिक पद्धतीने ज्या पक्षाकडे जागा असतील, तो पक्ष ती जागा लढवणार आहे, असं राऊत म्हणाले.
‘दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत’; विशाळगड हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य
पुढं ते म्हणाले की, महाविकास आघाडीत ज्या पक्षाला वाटतं की, आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या पक्षाने त्या जागेची मागणी करणं काही गैर नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून किती जागा आम्ही जिंकू शकतो, याचा आम्ही अभ्यास केला आहे. योग्य वेळी तो आकडा फोडला जाईल. माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला, असं राऊत म्हणाले.
राजकीय फायद्यासाठी विशाळगडाचा बळी देऊ नका
विशाळगड हिंसाचारावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले, विशाळगड प्रकरण हे राजकारणासाठी वापरले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजकारण न करता विशाळगडाचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन विशालगडाचा प्रश्न सोडवावा. राजकीय फायद्यासाठी विशाळगडाचा बळी देऊ नका, असंही राऊत म्हणाले.