कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यामध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणुक (Karnataka Assembly) होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. भाजप या राज्यात पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भाजपने काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. तर आता कॉंग्रेसनं देखील या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. नुकतीच कॉंग्रेसनं या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 124 उमेदवारांची नाव घोषित केली आहेत. या यादीत माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनाही कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रियांक खर्गे हे चैतूर मतदारसंघातून उभे राहणार आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी यांच्या नावाचाही या यादीत समावेश असून ते गदग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गणेश हुक्केरी, एबी पाटील, लक्ष्मी बेब्बलकर, अजय सिंह, सुभाष राठोड यासारख्या प्रचंड जनाधार असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात येणार आहे.
Rahul Gandhi : अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून हे प्लॅनिंग, राहुल गांधींवरील कारवाईवर प्रियंका भडकल्या
Congress party announces the first list of 124 candidates for Karnataka Assembly Elections.
Names of former CM Siddaramaiah, and State party president DK Shivakumar are present in the first list. pic.twitter.com/TC9vXJfrX5
— ANI (@ANI) March 25, 2023
कर्नाटक विधानसभेत एकून 224 जागा आहेत. सध्या या राज्यात भाजपचं सरकार असून बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांना जोरदार तयारी केी आहे. भाजपनंही या निवडणुकीसाठी आपला प्लॅन तयार केला. भाजपकडून भाजपशासित राज्यांतील योजनांचा आधार घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र, सध्या कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं बोलल्या जातं. त्यामुळं येडियुरप्पा हे काहीसे बाजुला झाले. याचा थेट परिणाम हा विधानसभेवर होऊ शकतो. त्यामुळं आता कॉंग्रेसनं या ठिकाणी जोर लावला आहे.
दरम्यान, पुढील वर्षा लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळं कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे लिट्मस टेस्ट म्हणून पाहिलं जातं.