Download App

“कॅबिनेटसाठी गुलाबराव पाटील राऊतांच्या दारात उभे होते; घ्या सप्तश्रृंगीची शपथ…”; ठाकरे गटाचा नेता भिडला

Sanjay Sawant on Gulabrao Patil : मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील हा माणूस संजय राऊतांच्या दारात उभा होता. पण आता ज्यांच्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांच्यावरच टीका करता, असा सवाल करत शिवसेना (UBT) संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी गुलाबरावांवर टीका केली. ते जळगावमध्ये जाहीर भाषणात बोलत होते. (Shivsena UBT Sanjay Sawant Criticize Gulabrao Patil)

शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला जातो. बंडासाठी राऊतच जबाबदार आहेत. राऊतांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधली अशी टीका केली जाते. गुलाबराव पाटील यांनीही अनेकदा अशा वक्तव्यांवरुन राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या याच वक्तव्यांवरुन सावंत यांनी गुलाबराव पाटलांना सुनावले. तसेच यावेळी त्यांना एक आव्हान देखील दिले.

‘सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन होणार’; राणेंच्या दाव्याने एकच खळबळ

काय म्हणाले संजय सावंत?

कॅबिनेट मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील हा माणूस संजय राऊतांच्या दारात उभा होता. मात्र ज्या संजय संजय राऊतांमुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्यांना हे म्हणतात की, संजय राऊतामुळे पक्षाची वाट लागली. त्यामुळे खरंच जर संजय राऊतांमुळे पक्षाची वाट लागली असेल तर गुलाबरावांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं हे पाप संजय राऊतांनी केलं म्हणून पक्षाची वाट लागली. त्यांनी वेळीच ओळखून पाटलांना पालकमंत्री करायला नव्हतं पाहिजे.

PM मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी; बायडन, सुनक आसपास सुद्धा नाहीत!

संजय सावंतांचं गुलाबराव पाटलांना आव्हान

संजय सावंत पुढे म्हणाले की, त्यांनी यावं, त्यांना माझं आव्हान आहे की, मी वणीच्या देवळात सप्तशृंगीच्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे. तुम्हीही ठेऊन दाखवा आणि सांगा कॅबिनेट मंत्रीपद, पालक मंत्रीपद कुणामुळे मिळालं? भाषण, शेरोशायरी करायची पण त्यांची अगोदरची भाषण ऐका त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे काहीही नव्हतं. कारण शिवसेना कुपोषित बालकांना गुटगुटीत करते. मात्र नंतर ते सोडून जातात. त्यामुळे तुम्ही नितिमत्तेच्या गोष्टी करू नका. तुम्ही कोणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही, अशी टीका संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

आजवर तुम्ही शिवसेनेला काहीही दिलेलं नाही. सगळं काही ओरबाडून घेतलं आहे. त्यामुळे पाटलांना भाषणातून बोलून चालणार नाही. त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाली पाहिजे, असं देखील यावेळी संजय सावंत म्हणाले.

 

Tags

follow us