PM मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी; बायडन, सुनक आसपास सुद्धा नाहीत!

PM मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी; बायडन, सुनक आसपास सुद्धा नाहीत!

Narendra Modi Most Popular Leader : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका जगभरात वाजत असल्याचं दिसून येत आहे. World Of Statistics या ट्वीटर हँडलने याबद्दलची आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के रेटिंग मिळवत प्रथम क्रमांकाची पसंती दिली आहे. (pm-narendra-modi-worlds-most-popular-leaders-76-percent-rating)

पहिल्या बायकोबद्दल बोलताना Rajpal Yadav झाला भावूक; म्हणाला “तिच्या पार्थिवाला खांदा..”

पीएम मोदींनी अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान यांच्या नेत्यांना मागे टाकत आपली लोकप्रियता वाढवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटरवर 89.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. काही तज्ज्ञांच्या मते पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमामुळे त्यांची लोकप्रियता अधिक प्रभावीपणे वाढत आहे. सध्याच्या काळात रेडिओ हा आऊटडेटेड असला तरी त्याच्यावरुन पीएम मोदी संवाद साधतात, त्यांची ही गोष्ट अनेकांना आवडत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


World of Statistics या ट्वीटर हॅंडलने दिलेल्या माहितीनुसार 76 टक्के लोकांनी पीएम मोदींना पसंती दर्शवली आहे. याच लोकप्रिय नेत्यांच्या यादीत जो बायडन यांच्या लोकप्रियतेचे रेटिंग 40 टक्के आहे. तर ऋषी सुनक यांच्या लोकप्रियता 31 टक्के आहे.

ऑगस्ट 2022 मध्येही अशाच प्रकारचा सर्वे करण्यात आला होता, त्यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे समोर आले होते. त्यावेळी मोदींना 75 टक्के रेटींग देण्यात आले होते. मोदींच्या नंतर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्यूएल लोपेझ ओब्रॅडोर यांचा क्रमांक होता. तर तिसऱ्या स्थानी इटलीचे पंतप्रदान मारिओ द्राघी यांचा क्रमांक होता. मेक्सिकोच्या अध्यक्षांना 63 टक्के तर इटलीच्या 54 टक्के रेटिंग होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube