Download App

श्रीगोंद्यात उमेदवार बदलला! प्रतिभा पाचपुतेंचा अर्ज मागे, नागवडेंविरोधात कोणता चेहरा?

श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.

Shrigonda Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच अहिल्यानगरमधील श्रीगोंदा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट समोर आलायं. भाजपकडून बबनराव पाचपुते यांच्याऐवजी पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पाचपुते यांनी पत्नी प्रतिभा पाचपुते आणि मुलगा विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांचा अर्ज दाखल केला होता. निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची आजचा शेवटचा दिवस असल्याने प्रतिभा पाचपुते यांनी आपला अर्ज मागे घेतला असून विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं. त्यामुळे आता महायुतीकडून विक्रम पाचपुते तर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा सुरु झालीयं.

महाविकास आघीडीकडून अनुराधा नागवडेंची उमेदवारी ‘फायनल’; श्रीगोंद्यात मशालीच वादळ घुमणार

महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे तर महायुतीकडून विक्रम पाचपुते हेच उमेदवार राहणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. तर वंचितलाही या मतदारसंघातून मोठा चेहरा हाती लागला असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला

उमेदवारांची नावे घोषित केली जात असतानाच श्रीगोंदा मतदारसंघात शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप हे इच्छूक असल्याचं समोर आलं होतं. जगताप यांना उमेदवार मिळणार असल्याचा दावादेखील केला जात होता. मात्र, पाचपुतेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच अनुराधा नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडून मातोश्री गाठत शिवबंधन बांधून आपलं तिकीट फिक्स केलं. नागवडे यांनी शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दरम्यान, आत्तापर्यंत तरी प्रतिभा पाचपुते वगळता अन्य कोणत्या उमेदवाराने अर्ज मागे घेतलायं की नाही, याबाबत अस्पष्टता असून दुपारनंतर कोणाचा अर्ज कायम आहे आणि कोणी माघार घेतलीयं, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.

follow us