Download App

‘सिल्व्हर ओक’वर ठाकरे-पवारांमध्ये सव्वा तास खलबतं! पण…

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : महाविकास आघाडीत समन्वय राहावा, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत आदी विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. जवळपास सव्वा तास चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाहून रवाना झाले आहेत.

महाविकास आघाडीतील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.अडाणी प्रकरणावरून विरोधकांची जेपीसीची मागणी करत आहेत. मात्र, शरद पवार हे जेपीसीला विरोध करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यांवरून सुरू असलेला वाद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी संदर्भातील वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची केली मागणी – Letsupp

जेपीसी, सावरकर, पंतप्रधानांची पदवी अशा विविध मुद्द्यांवरुन गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमध्ये मतभेद असल्याचं बघायला मिळत आहे. राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीची राज्यात वज्रमुठ सभादेखील सुरु झाल्या आहेत. पण दुसरीकडे महाविकास आघाडीत वारंवार मतभेद समोर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Tags

follow us