Download App

काँग्रेसच्या स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार; शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरेंचा नवा डाव

Snehal Jagtap Will Join The Shiv Sena Thackeray Group : राज्याच्या राजकरणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी सध्या घडत आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी देखील हालचाली करत आहे. यातच महाडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार माणिक जगताप (Manik Jagtap) यांच्या कन्या तसेच काँग्रेसच्या स्नेहल जगताप या काँग्रेसची साथ सोडत ठाकरेंच्या गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडत आहे. यातच काँग्रेसच्या स्नेहल जगताप या काँग्रेसला बाय बाय करत शिवबंधन हाती बांधणार आहे. महाडच्या चांदे क्रीडांगणावर शनिवारी (ता. 6) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती खुद्द स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी ठाकरेंचा डाव
शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच अनेक आमदारांनी शिंदे यांच्या गटात सामील होणे पसंत केले. दरम्यान आता याच शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहे. महाडचा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेतही मिळत आहेत.

उद्धव ठाकरे गटाकडून स्नेहल यांचं नाव आमदारकीचे उमेदवार म्हणून घेतलं जात आहे, मात्र महाविकास आघाडी करून उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असणार आहे? याबाबत पत्रकारांकडून विचारण्यात आले असता, आमचा निर्णय कोणत्या स्वरूपात बदलणार नसल्याचं सुनील जगताप यांनी स्पष्ट केलं.

राजकीय कोंडीसाठी ठाकरेंचा डावपेच
शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी महाड मतदारसंघामधून तीन वेळा विजय मिळविला. यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं व त्यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड झाली होती. शिंदे गटातील आमदारांना कोणत्याही स्थितीत पराभूत करण्याची रणनीती विरोधकांकडून सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाड मतदारसंघात रंगेल.

नाईट शिफ्ट करत असाल तर ‘या’ टिप्स फॉलो करा

आगामी निवडणुकीत आमदार गोगावले यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, हे आता स्पष्ट झालं आहे.

Tags

follow us