Download App

…तर प्रकाश आंबेडकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? स्वबळावर लढण्याचा इशारा

  • Written By: Last Updated:

निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीनेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर आज अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिले, तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे आहोत.”

यावेळी प्रकाश आंबडेकर म्हणाले की, “राज्यातील 2024 पर्यंतच्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढणार आहोत, पण शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिले, तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे आहोत.”

त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपली युती झाली नसल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. ते म्हणाले की, आमची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत नाही. मात्र, युतीची घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीसोबत आहोत, तुम्ही सुद्धा महाविकास आघाडी सोबत यायला हवे, असे म्हटले होते.

काँग्रेस राष्ट्रवादीकडून अनुकूल प्रस्ताव नाही

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असली तरी महाविकास आघाडीतील त्यांच स्थान काय हा प्रश्न होता. त्यावर बोलताना आज ते म्हणाले की “आम्ही महाविकास आघाडी सोबत येणार नाही असे कधीच म्हटले नव्हते; मात्र त्यानंतरही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कोणताही प्रस्ताव किंवा अनुकूलता नाही. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही.”

Tags

follow us