माळशिरसमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा; जानकरांचा मुलगा व सातपुतेंची पत्नी आमने-सामने

Solapur ZP Election 2026 : माळशिरसमधील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी आणि आमदार जानकर यांच्या मुलात लढत.

Ram Satpute Vs Uttamrao Jankar

Ram Satpute Vs Uttamrao Jankar

Solapur ZP Election 2026 : सोलापूर जिल्ह्यामध्ये (Solapur ZP Election 2026) झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जोरदार रणधुमाळी सुरू आहे. याच जिल्ह्यामध्ये एक विक्रम झालाय. तो विक्रम म्हणजे सर्वाधिक राजकीय नेत्यांचे मुले, पत्नी व इतर नातेवाईक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. त्यात माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) आणि माजी आमदार राम सातपुतेही ( Ram Satpute) हेही मागे राहिलेले नाहीत. झेडपीच्या इलेक्शनमध्ये दोघांनी एकमेंकाविरुद्ध कसा शड्डू ठोकलाय, हेच या व्हिडिओतून पाहुयात

सलग दोन निवडणुकीत पराभव पण राम सातपुते लढतायत
राम सातपुते यांचा सलग दोन निवडणुकीत पराभव झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले राम सातपुते हे मूळचे बीडचे. परंतु 2019 मध्ये भाजपने राम सातपुते यांना एससीसाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभेच्या रिंगणात उतरविले. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बळावर राम सातपुते निवडून आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते सध्याचे आमदार उत्तमराव जानकर. निवडणूक चुरशीची झाली आणि सातपुते हे अवघ्या 2702 मतांनी विजयी झाले. त्यानंतर लोकसभेला राम सातपुतेंना भाजपचं तिकीट सोलापूरमधून मिळालं. पण काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंचा तब्बल 75 हजार मतांनी पराभव केला.


जिल्हा परिषदेमध्येतही भाजपचं बिनविरोध वादळ कायम; सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय घडलं?


मोहितेंनी शब्द खरा करून दाखविला

लोकसभेपूर्वी मोहिते घरातील धैर्यशिल मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आले. सातपुतेंना एका रात्रीत विजयदादांनी आमदार केलंय, हेच पार्सल बीडला पाठविणार अशी गर्जना धैर्यशिल मोहितेंनी केली होती. मोहितेंना आपला शब्द खरा करून दाखविला. पण राम सातपुतेही घाबरले नाहीत. लोकसभेच्या पराभवानंतर पुन्हा भाजपने त्यांना माळशिरसमधून विधानसभेचे तिकीट दिलं. यावेळेस त्यांच्यासमोर शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचे आव्हान होते. जानकरांना मोहितेंची मदत मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये चुरशीचा सामना झाला. यावेळी मात्र उत्तमराव जानकरांनी सातपुतेंना बारा हजार मतांनी धूळ चारली.


मोठी बातमी! पुणे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर, काय आहे कारण?


राम सातपुतेंची पत्नी आणि जानकरांच्या मुलामध्ये लढत

सलग दोन निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सातपुतेंनी माळशिरसचे मैदान सोडलं. ते पक्षाचं काम करत राहिले. जानकर, मोहितेंविरुद्ध थेट बोलत राहिले. त्यांना पक्षातून हवं ते बळ मिळतं राहिलं. आता त्यांची पत्नी संस्कृती सातपुतेंना भाजपने झेडपीच्या मैदानात उतरवलंय. त्या माळशिरसमधील दहिगाव गटातून निवडणूक लढवत आहोत. त्यांच्यासमोर आव्हान मोठे आहे. कारण आमदार उत्तमराव जानकरांनी आपला मुलगा जीवन यालाच येथून मैदानात उतरविले आहोत.


स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष

संस्कृती सातपुते याही माळशिरसमधील नाहीत. त्या पुण्यातील आहोत आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. परंतु त्या या भागात सक्रीय राहिलेल्या आहेत. महिलांसाठी त्यांना सामाजिक काम केलेले आहेत. तर जीवन जानकर हे व्यवसायिक असून, तो राजकारणात सक्रीय आहेत. ते धानोरो गावचे सरपंच राहिलेले आहेत. बाहेरचा उमेदवारविरुद्ध स्थानिक असा राजकीय संघर्ष ही राम सातपुते आणि उत्तमराव जानकरांमध्ये झालेला आहे. तो संघर्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीत असणार आहे.

टायगर अभी जिंदा है क्या ?

खरी तर ही लढत राम सातपुतेविरुद्ध आमदार उत्तम जानकर यांच्यामध्येच आहेत. या निवडणुकीत राम सातपुतेंना झटका बसल्यास त्यांच्यावर मोठी नामुष्की येऊ शकते. कारण आम्ही बीडचं पार्सल बीडला पाठवलं, असं विरोधक छातीठोकपणे सांगतील. पण राम सातपुतेंनी ही लढाई जिंकल्यास तेही टायगर अभी जिंदा है असं गर्जना करून सांगतील हे नक्की.

Exit mobile version