Download App

2 दिवसात कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा.., उदयनराजेंनी दिला शिंदे-फडणवीसांना इशारा

  • Written By: Last Updated:

वाई : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या (Koyna Dam) उभारणीसाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे प्रश्न साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रश्न मांडला. कृष्णा खोरे अंतर्गत जेवढी धरणे झाली, त्यात धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात सोडवा, अन्यथा कोयनेची वीज बंद करणार असल्याचा इशारा खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar) यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. कोयना धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या या ठिय्या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी बोलतांना यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=X1zSKzw9xnQ

उदयराजे म्हणाले, कोयना प्रकल्पग्रस्तांविषयी मला वेदना होतात. डॉ. भारत पाटणकर हा प्रश्न कायम शासनदरबारी मांडला जातो आहे. मात्र, आज तब्बल ६० वर्षे होऊनही धरणग्रस्तांचा हा प्रश्न सुटला नाही. अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे काहीही देणं घेणं नाही. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा कोयनेची वीज बंद करू, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

कृष्णा खोरे प्रकल्पाचा उपाध्यक्ष असतानाही मला वेगळ्या कल्पना सुचला होत्या. त्यावेळी लोकांचे भले होईल, असं वाटलं होतं. तुमची ही अवस्था बघवत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या पदावर राहण्यात काय अर्थ नाही. माझी बांधीलकी तत्वांशी आहे, तुमच्याशी आहे. मात्र, जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे, असं उदयराजे यांनी सांगितलं.

Pune By-Poll Results 2023 : पहिल्या नऊ फेरीत धंगेकर आघाडीवर, रासनेंचे टेंशन वाढले

पुढे बोलताना उदयराजे म्हणाले, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे होता. आज तुमच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जामीन देऊन त्याग केला. आज सहा तप गेले पण, न्याय मिळाला नाही. यामुळे तुमची प्रगती थांबली. त्या वेळेस एका बाजूला धरण तर दुसर्‍या बाजूला पुर्नवसन हा निर्णय घेतला पाहिजे होता,. डॉ भारत पाटणकर यांनी शासनाकडे अनेकदा व्यथा मांडली. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासन आश्वासन देण्यात आले. अनेक आंदोलने झाली. इतर धरणांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी खंत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आता डॉ. भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे मी ही लढाई तुमच्या साथीने लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर लवकरच या बाबतीत बैठक लावून हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचा प्रयत्न असेल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ही काही तोडगा नाही निघाला तर शेवटी, ज्या धरणग्रस्तांनच्या व कोयना धरणाच्या जीवावर संपूर्ण राज्य आज प्रगतीपथावर आहे. त्या धरणाची सूत्र हाती घेण्यास आम्हास वेळ लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Tags

follow us