Jan Samman Yatra: सध्या अजित पवारांनी विधानसभेसाठी दंड थोपाटलेले दिसतायेत. (Jan Samman Yatra) त्यांची नुकतीच जन सन्मान यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना ते स्वत: लोकांना समजावून सांगत आहेत. दरम्यान, अजित पवारांनी कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका लोकसभेला बसल्याचं जाहीर केलं आणि आपण माफी मागतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Ajit Pawar: लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं बटन; काय म्हणाले अजित पवार?
कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली, चूक झाली, माफ करा असं अजित पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला. विशेषत: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. सरकारच्या या निर्णयाचा महायुतीला मोठा फटका बसला याची जाहीर कबुली अजित पवारांनी दिली आहे.
यावेळी अजित पवारांनी वीज बील माफ केल्याचंही शेतकऱ्यांना सांगितलं. मागचं थकलेलं बिल द्यायचं नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला. कंबर मोडली, आमची चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ करण्याचा निर्णय झाला आहे. दूध,कापूस, सोयाबीन, भात यासाठी योजना आणल्या आहेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार -सुनिल तटकरे
आम्हाला लाँग टर्म राजकारण करायचं आहे, औट घटकेचं राजकारण करायचं नाही. उद्या लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. खोटा नेरेटिव्ह कोणी सेट केला तर त्याला बळी पडू नका, ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी 45 हजार कोटी रुपयांची योजना आहे. योजना सुरू राहण्यासाठी आम्ही पुढे गेले पाहिजे तुम्ही आमचं बटण दाबलं पाहिजे. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.