Download App

महाराष्ट्रातच लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात का? पवारांनी उघड केली भाजपची खेळी

बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Baramati Sabha : सध्या लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक मोठं गमतीचं आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. तिथे एका दिवसात निवडणूक आहे. उत्तरप्रदेशमध्ये 83 जागा आहेत. तिथे दोन दिवसांत निवडणूक आहे. (Sharad Pawar) मात्र महाराष्ट्रात 48 जागा असतानाही 5 दिवस येथे निवडणूक होत आहे. मग 42 जागा असताना तामिळनाडू येथे एक दिवसात निवडणूक होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही? असा थेट प्रश्न विचारत शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे. ते बारातमती येथे प्रचार सभेत बोलत होते.

 

खोटी आश्वासन दिली आणि फसवलं

ज्या यंत्रणांनी काही अहवाल दिले त्यामध्ये भाजपला तामिळनाडू येथे यश मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी पर्याय शोधला. तो पर्याय म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात घ्यायची. तिथं वारंवार जायचं. वेगवगळे दावे करायचे. खोटे आश्वासन द्यायची, लोकांची फसवणूक करायची असा गंभीर आरोप शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

 

यांना सत्ता देण घातक ठरेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आले ते 2014 ला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महागाई जास्त असल्याचं सांगितल. त्यावेळी 2014 ला पेट्रोलचा दर 71 प्रतिलीटर असा होता. त्यावेळी मोदी म्हणाले माझ्या हातात सत्ता द्या मी पेट्रोलचा दर आणखी खाली आणतो असं आश्वासन दिलं होत. परंतु, आज फक्त 50 नाही तर 3 हजार 650 दिवस झाले पण हे इंधनाचे दर खाली आणू शकले नाहीत, अशी थेट आकडेवारी देत पवारांनी मोंदीवर जोरदार हल्ला केला.

 

दोन मुख्यमंत्र्यांना अटक केलं

आज पेट्रोल 106 रुपये लिटर आहे. 1200 रुपये सिलेंडर आहे. या दैनंदिन गोष्टींचे दर तसंचे आहेत म्हणून अनेक कुटुंबांना रोजचं जगणही कठीण झालं आहे. परंतु, मोदी आजही खोट बोलत आहेत असा आरोप पवारांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर हे कुणाला रोजगार देऊ शकत नाहीत, महागाई कमी करू शकत नाही त्यामुळे यांच्या हातात सत्ता देण घातक ठरेल असही पवार यावेळी म्हणाले. तसंच, विरोधात बोलल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सुरेन यांना भाजपवाल्यांनी अटक केली असा थेट आरोप पवारांनी यावेळी केला आहे.

follow us