सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’

  • Written By: Published:
सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’

पुणे : एकीकडे लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची विजयासाठी भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यात सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे बारामती मतदार संघ. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीदेखील बारामती काबीज करण्यासाठी सर्वात प्रथम पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांची भेट घेतली. त्यामुळे दुसरीकडे पवारांची धाकधूक वाढली.

थोपटेंच्या रणनीतीमुळे सुप्रिया सुळेंना पराभवाचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज पवारांना आला आणि त्यांनी थेट कट्टर विरोधक असणाऱ्या अनंतराव थोपटेंची सदिच्छा भेट घेतली. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या भेटी होत नाही तोच आता अजितदादांना कात्रीत पकडणाऱ्या शिवतारेंनीदेखील थोपटेंची भेट घेतली असून, पवारांना राजकीय आखाड्यात चितपट करणारे थोपटे लोकसभा निवडणुकीत विजयी करत बारातमतीचा ‘ताज’ नेमका कोणाच्या डोक्यावर ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Vijay Shivtare Meets Anantrao Thopate In Bhor)

Saroj Patil : पवारांच्या बहिणीने सांगितलं बारामतीचं तख्त कोण जिंकणार!

सुनेत्रा पवारांनी वाढवली पवारांची धडधड

बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अद्याप महायुतीकडून किंवा राष्ट्रवादीकडून कोणत्याही अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडून येथून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया यांना पराभूत करण्यासाठी पवारांचा जुन्या वैऱ्याची भेट घेत रणनीती आखण्यास सुरूवात केली. सुनेत्रा यांची ही चाल पवारांची धडधड वाढवण्यास कारणीभूत ठरली. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांमध्ये मतांचं गणित जुळवण्यासाठी थोपटे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

सुप्रिया सुळेंसाठी पवार विसरले 40 वर्षांचे वैरे

बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे. मुलीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी मुलीला निवडून आणण्यासाठी सर्वांची मोट बांधणी सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी 40 वर्षांपासून राजकीय वैर असलेल्या अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अजितदादांच्या बंडानंतर बारामतीची लढाई सोपी नसणार याची जाणीव पवारांना झाल्यानेच त्यांनी 40 वर्षांपूर्वीचे वैरे बाजूला ठेवत कट्टर विरोधक असणाऱ्या अनंतराव थोपटेंची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.

एकीकडे सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं गणित सुटत नाही तोच आता बारामतीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून उतरणाऱ्या विजय बापू शिवतारेंनीदेखील थोपटेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शिवतारेनीही थोपटेंना जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी साद घातली आहे. पुरंदरचे सर्व मतदार आपल्या मागे असल्याचं शिवतारेंनी यावेळी थोपटेंना सांगितलं.

संध्याकाळपर्यंत वर्ध्यातून माझी उमेदवारी निश्चित; पवारांच्या भेटीनंतर कराळे गुरूजींना विश्वास

मी माफ केलं पण जनता…

थोपटेंच्या भेटीदरम्यान शिवतारेंनी थोपटेंना शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं याची आठवण करून दिली. एवढेच नव्हे तर, अजितदादांनी जाहीर सभेत माझी लायकी काढली. त्यामुळे हा अपमान पुरंदरच्या मतदारांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच येथील जनता आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही असे ठामपणे सांगत असल्याचे थोपटेंना शिवतारेंनी सांगितले आहे. तर, दुश्मनी राहिली बाजूला, मी यांना माफ केलं, पण जनता माफ करणार नाही हे ग्राऊंड रिअॅलिटीदेखील शिवतारेंनी थोपटेंना दाखवून देत याचसाठी मी निवडणूक लढवत आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा असल्याची साद शिवतारेंनी थोपटेंसमोर ठेवली आहे.

बारामतीमध्ये अजितदादांची ‘साखरपेरणी’ : संग्राम थोपटेंसाठी मोठा डाव

यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. अशात आता भोर, वेल्हा, मुळशी या तीन तालुक्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघातील टेन्शन कमी करण्यासाठी अजितदादांनी ‘साखर पेरणी’ला सुरुवात केली आहे.असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे.

राज्य सरकारने भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 12 आणि केवळ एकाच काँग्रेसच्या (Congress) नेत्यांशी संबंधित अशा एकूण 13 साखर कारखान्यांना एक हजार 898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात अनंतराव थोटपे यांच्या मुलाच्या राजगड साखर कारखान्यास राज्य शासनाकडून 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. या माध्यमातून थोपटेंना खूश करुन त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी त्यांची मदत घेण्याचा अजित पवार यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं

पवारांना राजकीय आखाड्यात चितपट करणारे थोपटे कोण?

एकीकडे बारामतीमध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागलेली असतानाच विजयासाठी दिग्गज नेते थोपटेंसमोर पायघड्या घालत आहे. पण हे थोपटे नेमके कोण आहेत. तर, अनंतराव थोपटे हे 1995 पूर्वी राज्यातील अनेक सरकारांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. अनंतराव यांची शरद पवारांचे सर्वात मोठे विरोधक म्हणून ओळख आहे.

1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भोरला त्यांनी सभा घेतली होती. या ठिकाणांवरुन अनंतराव थोपटे यांचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणले होते. त्यावेळी थोपटे कांग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जात होते. परंतु पराभव झाल्यामुळे त्यांची संधी हुकली. हा पराभव त्यांचा चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा थोपटे विजयी झाले. परंतु सत्तेपासून कायम दूर राहिले. या दरम्यान शरद पवार आणि थोपटे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत राहिले. अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते. सोबतच ते मंत्री देखील होते. त्यानंतर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे गेली 18 वर्षे आमदार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज