पुण्यात भाजपला धक्का! माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय शरद पवार गटात
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये (Pune News) फोडाफोडीचे राजकारणाने वेग घेतला आहे. आताची बातमी पुण्यातून आली आहे. शरद पवार गटाने मोठा डाव टाकत भाजपला धक्का दिला आहे. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक सुनील माने यांनी आज शरद पवार यांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. सुनील माने यांच्यासह माजी नगरसवेक आरिफ बागवान, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडकर यांनीही पक्षात प्रवेश केला.
Sharad Pawar : ‘अमित शाहांनी मान्य केलं, मी त्यांचा आभारी’ शरद पवारांचं खोचक प्रत्युत्तर
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. आघाडीच्या नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे पक्षात नेत्यांचं इनकमिंगही वाढलं आहे. सुनील माने यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील माने यांची ओळख होती. माजी खासदार गिरीश बापट स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यामुळे माने यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. गिरीश बापट असताना माने यांनी सर्वसामान्यांची कामे करत आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलं.
सुनील माने यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शिवाजीनगर मतदारसंघातून माने नशीब आजमावण्यास इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना संधी नाकारली. त्यामुळे माने नाराज झाल होते. या नाराजीतूनच त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. माने यांच्याबरोबर आणखी हजारो कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. निवडणुकीआधी घडलेली ही घडामोड भारतीय जनता पार्टीचे टेन्शन वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे.
Pune Loksabha : वसंत मोरेंसाठी आमदार धंगेकर माघार घेणार? धंगेकर म्हणतात
माने यांच्या प्रवेशाने पुण्यात शरद पवार गटाची ताकद निश्चितच वाढणार आहे. परंतु आता ज्या उद्देशासाठी सुनील माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला ते साध्य होणार का, सुनील माने यांना पुणे लोकसभेचं तिकीट मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल.