Ajit Pawar criticizes Nilesh Lanke : अजित पवारांची भाषा आणि त्यांचा गावरान भाषेत विरोधकांचा समाचार घेण्याचा इतिहास काही नवा नाही. तसंच, अजित पवारांनी आजपर्यंत अनेक आमदारांना थेट आव्हान दिलेलं आहे. “तु कसा आमदार होतो हे मी बगतो” हे वाक्य त्यांनी विजय शिवतारेंना वापरलं होत ते आजही कायम चर्चेत असंत. आज अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा दम भरण्याची भाषा वापरली आहे. महाविकास आघाडीचे (Ahmednagar Lok Sabha ) अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले “महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है,” अशा शब्दांत अजित पवारांनी लंके यांना दम भरला आहे. ते पारनेर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते.
पैशांसाठी गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका साकारली; अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा
माझ्या नादी लागू नको
अजित पवार म्हणाले मला इथ आल्यानंतर कानावर आलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. तसंच, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भर सभेतून दमदाटी केली जात आहे. हे असं होत असेल तर “निलेश लंके तु ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे” असा डायलॉगही अजित पवारांनी यावेळी मारला. तसंच, “माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागणाऱांचा मी चांगला बंदोबस्त केला आहे” अशा शब्दांत त्यांनी लंके यांना भर सभेत दम भरला आहे.
तुमच्या मागणीमुळेच उमेदवारी दिली
यावेळी पुढे बोलताना अजित पवार लंके यांच्या उमेदवारीवरूनही बोलले. पारनेरकरांच्या मागणीमुळेच मी लंके यांना विधानसभेची उमेदवारी दिली. लंके यांना उमेदवारी द्या म्हणून सांगणारे इथच बसलेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाली नाही अशी कबूली देत अजित पवार यांनी आचारसंहितेनंतर हे अनुदान दिलं जाईल असं अश्वासनही पवार यांनी यावेळी दिलं.
नगरकरांमध्ये निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद; मोदींच्या सभेतील गर्दीने लंकेंना टेन्शन
तुल्यबळ लढत
अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरवला आहे. डॉ. सुजय हे आपला राजकीय वारसा व आपले शिक्षण प्रचारात सांगत आहेत. तर आपण सामान्य घरातील आहोत व डॉक्टर नसलो तरी कोविडमध्ये जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविणारे डॉक्टर आहोत, असा लंके यांचा प्रचार आहे. विखे हे परिवारामुळे लोकप्रिय आहेत. तर, आपल्या संपर्कामुळे लंकेही तेव्हढेच लोकप्रिय झाले आहेत.