Ajitdada मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाणार: निलेश लंके

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी मोठे विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना अजितदादांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री ( Chief Minister )  करायचे आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात […]

Untitled Design (12)

Untitled Design (12)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी मोठे विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना अजितदादांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री ( Chief Minister )  करायचे आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अजित पवार, हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना लंके म्हणाले, येणाऱ्या काळात आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. अजितदादांची काम करण्याची पद्धत आपल्याला एका वर्षात घराघरापर्यंत पोहोचवायची आहे. पुढील वर्षी निवडणूका आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. विकासाचा थांबलेला गाडा पुढे नेण्यासाठी अजितदादांना आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हणत त्यांनी अजितदादांची स्तुती केली. तसेच अजितदादा हे 5 वर्ष मुख्यमंत्री झाल्यास राज्य विकासाच्या बाबतीत 25 वर्षे पुढे जाईल, असे म्हणत लंके यांनी अजितदादांचे कौतुक केले. अजितदादांसारखी उर्जा, त्यांच्यासारखा कामाचा झपाटा मी कोणत्याही नेत्यामध्ये पाहिलेला नाही, असेही लंके म्हणाले.

बोलताना लंके पुढे म्हणाले,  पुण्यातील गणेशोत्सव हा देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. गणोशोत्सावाच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे, असे लंके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

Exit mobile version