..तर लोकशाहीवरचा विश्वास उडणार, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य

Untitled Design   2023 02 10T104419.525

अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.

Cow Hug Day : मिठी मारण्यासाठी गाय कुठून आणायची? Jitendra Awhad यांचा सवाल

पवार पुढे बोलताना म्हणाले, नेत्यांना पैशांची ऑफर येत असेल आणि नेते ही पैशांची ऑफर ऐकत असतील तर ते योग्य नसल्याचं रोहित पवारांनी म्हंटलंय. तसेच अशा पध्दतीने पैशांच्या बाबतीत चर्चा होत असेल तर ते योग्य नसल्याचं पवार यांच्याकडून सांगण्यात आलंय.

अध्यक्षपद भूषविताना मला.., P. T. Usha यांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षाचं कामकाज

खरंच ही गोष्ट किती स्वीकारण्यासारखी आहे , हे आता नेत्यांनीच ठरवलं पाहिजे, जर नेत्यांना अशी ऑफर येत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्यांच्याबाजूने असणार असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Chichwad byElection : मित्र की पक्ष? अमोल कोल्हे कोणाच्या सोबत ?

दरम्यान, जे आपण ऐकत आहोत, त्यामध्ये खूप मोठा व्यवहार झाल्याचं ऐकायला मिळतंय. लोकशाहीत जर असं झालं तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणारचाही त्यांनी दावा केला आहे.

Tags

follow us