Chichwad byElection : मित्र की पक्ष? अमोल कोल्हे कोणाच्या सोबत ?
पुणे : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन राजकीय (Political)वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळातंय. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीत (NCP) चांगलीचं खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर नाना काटे यांना उमेदवारी मिळाली.
पण नाना काटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी, भाजपच्या दोन्ही उमेदवारांसोबत आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं चिंचवडची पोटनिवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे.
भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहे. स्वतः अजित पवार यांनीही यासाठी चर्चा केल्याचं बोललं जात. यासोबत आमदार सुनील शेळके हेदेखील अर्ज मागे घेण्यासाठी मध्यस्थी करत आहेत, पण यावेळी अमोल कोल्हे मात्र कुठेच दिसत नाहीत. अशी चर्चा रंगली आहे.
अमोल कोल्हे हे राहुल कलाटे यांचे जवळचे मित्र मानले जातात. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अमोल कोल्हे शिवसेनेत करत होते. त्यावेळी पासून त्यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. अमोल कोल्हे जेव्हा छत्रपती संभाजी राजे मालिका करत होते त्यावेळी मुंबईवरून शूटिंग वरून आल्यावर पुण्यात आले कि कोल्हे राहुल कलाटे यांच्याच घरी मुक्कामाला असत.
अमोल कोल्हे २०१९ साली शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले त्याहीवेळी त्यांचे राहुल कलाटे यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे कलाटे यांच्याशी घरगुती संबंध असले तरी सध्या ते पक्षाच्या विरोधात आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे कोणाच्या पाठी उभे राहणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके अर्ज मागे घेण्यासाठी मध्यस्थी करत असले तरी अमोल कोल्हे मात्र कुठेच दिसत नाहीत. काही दिवसापासून अमोल कोल्हे आपल्याच पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे अमोल कोल्हे नक्की काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.